Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २२ जून, २०२३

विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या शैक्षणिक संस्थेवर शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई करण्यास टाळाटाळ का ? !! माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?



धुळे प्रतिनिधी:- धुळे इंडेक्स नंबर नसलेल्या सोनगिर येथील विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थेवर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पुरावे देऊनही संस्थेवर कारवाई करण्यास शिक्षणाधिकारी का टाळाटाळ करत आहे ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून संबंधित शैक्षणिक संस्थेवर कारवाई करण्याची मागणी होत असताना देखील शिक्षणाधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर नाराजी व्यक्त केली आहे.संबंधित शैक्षणिक संस्थेकडे एकच वर्ष मान्यता असताना देखील शिक्षणाधिकारी म्हणतात कायमस्वरूपी मान्यता आहे. याबाबत शैक्षणिक संस्थेविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडून दोन दिवसांपासून कारवाईचे पत्र काढण्यास उशीर का केला जात आहे ? शिक्षणाधिकारी नेमक कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे ? विद्यार्थ्यांची फसवणूक करून शैक्षणिक वर्ष बरबाद करणाऱ्या संस्थेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांचा अर्थपूर्ण व्यवहार झाला का ? संबंधित शैक्षणिक संस्थेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून संस्थेचे मान्यता रद्द करण्याचे धाडस शिक्षणाधिकारी करतील का ? असे प्रश्न फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाला केले आहे.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्षाना निवेदन देऊनही कारवाई होण्यास उशीर होत असल्याने या प्रकरणात वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शैक्षणिक संस्था विरोधात कारवाई करण्यासह विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार आहे. याप्रसंगी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध