Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ जून, २०२३

ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी कॉम्पोझिट फोम चा अविष्कार,साक्री तालुक्यातील पिंपळनेरच्या (बल्हाणे) गौरव बिरारीसच्या संशोधनाचा इटली आणि नार्वेतील कंपन्यांकडून उपयोग



ध्वनी प्रदूषण किंवा गोगाट कमी करण्यासाठी विशेष तंत्रज्ञान उपलब्ध नाही. भिंतींना कापूस, फोम, गलासवुन अशा गोष्टी लावून साऊंड इन्सुलेशन करण्याचा मार्ग बहुतांश अवलंबला जातो. पण यापैकी सर्वोत्कृष्ट असा पॉली पाॅलीयुरिथीन फोमही जेमतेम 30 डेसिबलपर्यंत (1 ईच जाड थर लावल्यास) दोन्ही कमी करू शकतो. पण पिंपळनेरचे एम टेक केलेले गौरव बिरारीस यांनी नवीन कंपोझिट फोम तयार केला आहे.
हा फोम पाॅलीयुरिथीन फोरमच्या तुलनेत ध्वनीची तीव्रता 550 ते 1200 पटीने कमी करतो त्यामुळे 90 ते 100 डिसिबलचा गोंगाटही कमी हे.मी.च्या थराद्वारे थांबवता येऊ शकतो.त्याने याचे पेंटेट रजिस्टर केले आहे.ते वापरण्याचे लायसन्स त्याने इटली आणि नाॅर्वेच्या एक एक अशा दोन कंपन्यांना दिले आहे.इटलीत मुख्यालय असलेल्या a2a.या भू राष्ट्रीय उद्योग समूहाने काच पूर्ण प्रक्रिया प्रकल्पासाठी काचेच्या बाटल्या गोळा करताना व हाताळताना होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या तंत्रज्ञानाचे लायसन्स घेतले आहे. तसेच नाॅर्वेच्या इक्चिनोर घेतले आहे.तसेच नाॅर्वेच्या इक्चिनोर या कंपनीलाही रासायनिक कारखान्यात वापरासाठी नॉन एक्स क्लुझिव लायसन्स दिले आहे.इक्चिनोर मनुष्य विरहित कारखान्याची डिझाईन व निर्मिती करते नेहमी 85 डेसिबल पेक्षा जास्त आवाज असणाऱ्या या कारखान्यांना आवाजाची तीव्रता कमी करण्यासाठी नविन्यपूर्ण कंपोझिट फॉर्म चा वापर त्यांनी सुरू केला आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध