Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १९ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी.एम.बायोटेकची जैविक उत्पादने कसमादे पट्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना ठरत आहेत फायदेशीर
पी.एम.बायोटेकची जैविक उत्पादने कसमादे पट्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना ठरत आहेत फायदेशीर
आज नाशिक जिल्ह्यातील कळवण,देवळा व सटाणा मालेगाव, तालुक्यातील काही प्रगतिशील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या डाळिंब बागांना भेटी दिल्या.
मागच्या काही वर्षांपासून आम्ही स्वतःच्या शेतात करत असलेल्या कामांमुळे तेलकट व डाग मुक्त डाळिंब उत्पादन करण्यासाठी विशेष असे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. या तंत्रज्ञानात खालील गोष्टींचा समावेश होतो.
१. वॉटर सोल्युबल खतांचा वापर पूर्णपणे बंद करून दाणेदार रासायनिक खतांचा बेसल डोस मधून वापर.
२. दाणेदार खतांचा स्लरीच्या माध्यमातून वापर वाढवला व स्लरी,जीवामृत,दशपर्णी अर्क वापरायला सुरुवात केली .
३. प्रतिजैविक या प्रकारच्या औषधांचा वापर पूर्णपणे बंद करून सुडोमोनस व बॅसिलस या जिवाणूंचा प्रत्येक २५ दिवसांतून एक फवारणी.
४. पी एम बायोटेकची उत्पादने सुडोमोनस, ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसेस या जिवाणू व बुरशींचा प्रत्येक ४५ दिवसांतून जमिनीतून ड्रीपद्वारे वापर.
५. पी.एस.बी., के.एम.बी., व मायकोरायझा यांचा प्रत्येक ६० दिवसांतून ड्रीपद्वारे जमिनीतून वापर.
६. प्रत्येक वर्षी माती परीक्षण व हंगामात २ वेळा पान देठ परीक्षण.
७. आवश्यकतेनुसार नुसार प्रत्येक १२ दिवसांतून कीड व रोगाच्या प्रादुर्भाव बघून फवारणी.
८. फळ काढणीनंतर लगेच पुढच्या हंगामासाठी झाडात स्टोरेज करण्यासाठी कामकाज.
९. जैविक व अजैविक ताण कमी करून झाडाचे पोषक करण्यासाठी प्रयत्न.
१०. प्रत्येक १० दिवसांनी ड्रीपच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये यांचा वापर.
वरील तंत्रज्ञानाचा वापर आज भेटी दिलेल्या प्लॉट्सवर मागील काही वर्षांपासून होत होता. आज यातील काही प्लॉट्स बघून वरील तंत्रज्ञानाचा डाळिंब झाडांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.
विशेषतः नारायण भाऊ निकम यांचा डाळिंब प्लॉट मागच्या वर्षी पूर्णपणे १००% तेलकट डाग रोग बाधित होता पण या तंत्रज्ञानाचा अवलंब करून जवळपास ९० - ९५ % चांगला माल आज त्यांच्या प्लॉट मध्ये आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे व पी एम बायोटेकचा ऑल राउंडर च्या वापराने त्यांच्या प्लॉट मधील तेलकट डाग रोग हा जवळपास ९०% पर्यंत नियंत्रित झाला आहे. नारायण भाऊंनी मागच्या वर्षी हा प्लॉट काढण्याचे ठरवलं होतं व प्लॉट मधील ४-५ झाडे उपटले असतांनाच कोणीतरी त्यांना या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सांगितले व त्यांनी प्रत्येक्ष आमच्या प्लॉटला भेट दिली व एक वर्षासाठी प्लॉट ठेवण्याचं ठरलं आज त्यांच्या प्लॉटला खूप चांगली फळं आलेली आहेत व १५ ते २० दिवसांत माल निघेल.
पी एम बायोटेकच्या औषध व खताचा वापराने डाळींब उत्पादकामध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा