Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ जून, २०२३

खामखेडा गावात जय सीयाराम ब्रम्हचैतन्य शबरी आश्रमात संत भजनी मंडळींचे संत भजन आनंदोत्सवात संपन्न....!



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपुर जय हरी, जय सीयाराम ब्रम्हचैतन्य शबरी आश्रम खामखेडा प्र.आंबे सरपंच,
उपसरपंच,
सदस्य व ग्रामस्थांमार्फत यांच्या पारमार्थिक प्रयत्नाने राबविण्यात येणारे व्यसनमुक्तीतुन तंटामुक्तीकडे तंटामुक्तीतुन अध्यात्मतेकडे आणि अध्यात्मतुनच मानवता धर्म वाढवुन गावात भक्तीमय शांतता,सुव्यवस्था राखण्याकरीता महिण्याच्या प्रत्येक दहा तारखेला धार्मिक वातावरणात भजन,सत्संग,महाप्रसाद देऊन भक्तांना आमंत्रीत केले जाते शिरपुर तालुक्यातील वारकरी,टाळकरी,वैष्णव एकतारी दि.१०/६/२०२३ रोजी स.१०पासुन सर्व भक्तांनी संत भजनांचा आनंद घेतला या प्रसंगी श्रीराम मंदीर सर्वेसर्वा,महंत सतिषदास भोंगे महाराज,हरीबाबा,गमदास बाबा,शिरपुर तालुका सांगवी पोलिस स्टेशनचे API खलाणे साहेब,
सारंगखेडा पोलिस स्टेशन APIभगवान कोळीसाहेब,जाधव साहेब,मंगेश मोरेसाहेब,नेरकरसाहेब,वारकरी साहित्य परिषद ता.अध्यक्ष संजय पाटील,जेष्ठ वारकरी पुरस्कृत विश्वासराव पाटील,जेष्ठ वारकरी पुरस्कृत विठोबाबापु महाराज,भाजपा आध्यात्मिक संघटना शहराध्यक्ष संतोष माळी,श्रीगुरु सेवा प्रतिष्ठान ता.अध्यक्ष देवराम पाटील,मुर्दुगाचार्य विश्वास पाटील,जेष्ठ वारकरी फकिरा महाराज,
बापुदास महाराज शिर्डी,मधुर गायनाचार्य परमेश्वर महाराज,वारकरी साहित्य परिषद कार्याध्यक्ष नारायण महाराज,जयेश भोंगे या सर्व प्रमुख अतिथींचा रुमाल,फुल देऊन मान सन्मान करण्यात आला तसेच शिरपुर तालुका वारकरींनी जेष्ठ वारकरी पुरस्कृत,पोलिस पाटील जगन्नाथ महाराज यांना कपडे,फुलहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास शिरपुर,वरवाडे,वाघाडी,
उंटावद,भटाणे,अर्थे,दहिवद,रोहीणी,भोईटी,हिगाव,हिवरखेडा,आंबे,वरला,वडेल,खंबाळा,जोयदा,लासुर,चौगाव,विसनापुर या सर्व भजनी मंडळींनी भजनांचा आनंद घेतला सर्व भजनी मंडळींचा विशेष सन्मान करण्यात आला व सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध