Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ११ जून, २०२३
पी एम बायोटेकचा रायझोबिअम जिवाणूंची कार्यपद्धती व वापरण्याचे फायदे
पी एम बायोटेकचा रायझोबिअम जिवाणू बियाण्याला चोळल्यानंतर आपण ते बी जमिनीत लावतो.जर जमीन ओलसर असेल तर हे जिवाणू बियाणांच्या सभोवताली थोड्या दिवसांसाठी वनस्पतीच्या कुजलेल्या खतांवर जिवंत राहतात.बियांपासून त्याचे रोपात रुपांतर होते तेव्हा हे जीवाणू त्या मुळांच्याभोवती एकत्र होतात, कारण या रोपांची मुळे काही प्रमाणात साखर,जीवनसत्वे,सेंद्रिय आम्ले व वाढवर्धक पदार्थ जमिनीमधे सोडतात.पिकांच्या मुळाने जमिनीत सोडलेल्या वेगवेगळ्या पदार्थावर रायझोबिअम हे जिवाणू खुप योग्य प्रकारे वाढतात त्यामुळे हे जिवाणू मुळाजवळच्या मातीमध्ये जास्त प्रमाणात एकत्र येउन वाढतात.
पिकांची मुळे वरील द्रव्याप्रमाणेच ट्रिप्टोफॅन नावाचा द्रव्य बाहेर सोडतात,तो द्रव कालांतराने इंन्डोल अॅसिडमधे बदलतो. त्या द्रवामुळे मुळांवरती विकृती निर्माण होते व मुळे वाकतात तर काही वेळा गोळा होतात.जिवाणू पेशी सुद्धा पाण्यात विरघळणारे विशिष्ट पॉलीशर्कराइड मुळांजवळ सोडतात.मुळांच्या पेशीमधुन नंतर ते गाभ्यापर्यंत पोहोचतात व त्यामुळे काही (पॉलीगॅलॅक्टोनेज) विकार तेथे तयार होतात.वरीलपैकी संप्रेरके व वाढवर्धक पदार्थांच्या उत्सर्जनामुळे मुळाशी त्वच्या मलुल पडते व दोन पेशी मधला भाग विद्राव्य होतो व वापरलेल्या रायझोबिअम जिवाणूंच्या पेशी मुळामधे प्रवेश करतात.
हा प्रवेश एखाद्या धाग्याप्रमाणे एकलगट असतो.एकापेक्षा अनेक प्रवेशिका एकाच मुळावर असल्यामुळे त्यावर अनेक गाठी निर्माण होतात.मुळामधे गेलेला रायझोबिअम जिवाणुंच्या दोरीप्रमाणे हा धागा तुटतो व त्यामधून असंख्य रायझोबिअम पेशी बाहेर पडतात.यामुळे मुळाच्या आतील पेशी वाढतात व मुळावर गाठी येतात.रायझोबिअमच्या या पेशी हवेतील नत्रवायू अमोनिया स्वरूपात स्थिर करतात व तो अमोनिया रोपातील सेंद्रिय पदार्थाबरोबर एकरूप होउन अमिनो आम्ले बनवतात व ही आम्ले कालंतराने पिकांच्या बियामधे प्रथिनांच्या स्वरूपात साठवण करून ठेवतात.
जर जमिनीमधे सुत्रकृमिंचे प्रमाण जास्त असेल तर सुत्रकृमीमुळे पण कडधान्य/ डाळवर्गीय पिकांच्या मुळाभोवती गाठी तयार होतात. पण बघायला गेल तर त्या गाठी रायझोबिअमच्या गाठींच्या प्रमाणात वेगळ्या दिसतात.रायझोबिअमचे फायदे: उत्पादन खर्चात बचत होते व आर्थिक उत्पन्न वाढते. उगवण क्षमतेत वाढ होते.नत्रांचे स्थिरीकरण होण्यास मदत होते.सजीवांची हानी होत नाही व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा