Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ५ जून, २०२३

वरवाडे परिसरातील भक्तांचे पंढरपुर वारीला पायी दिंडीचे प्रस्थान



शिरपुर प्रतिनिधी :-  शिरपूर पाऊले चालली पंढरीची वाट....शिरपुर संंत सावता माळी हरीपाठ महिला मंडळाने काढलेल्या वरवाडे ते श्री श्रेत्र पंढरपुर पायी दिंडी सोहळ्याला दि.३/६/२०२३ रोजी वटपोर्णिमेच्या दिवशी दु.४ वा.संत सावता माळी मंदीरापासुन प्रारंभ झाला दिंडी चालक ह.भ.प.बन्सीलाल अहिरे यांनी धार्मिक वातावरणात  पायी दिंडीत २० महिला व ०५ पुरुष वारकरी,भाविक सर्वांनी वारीला प्रस्थान केले  यात वरवाडे येथील भाविकांनी मंदीरात विठ्ठल  रखुमाई व सावता महाराजांची महाआरती करुन पादुकांचे पुजन करण्यात आले यावेळी संत सावता माळी समाज ट्रस्ट्र अध्यक्ष काशिनाथ माळी,शिरपुर वरवाडे नगर परिषद माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,संत सावता माळी समाज ट्रस्ट्र सहसचिव संतोष माळी,विणेकरी मन्साराम पवार,बापु माळीसर,योगेश राजपुत,विजय बागुलसर,भिका महाजन, बारकु माळी याच्या हस्ते पादुकांचे पुजन करुन  सर्व भाविकांनी हरी नामाचा गजर करत संपुर्ण गावातुन अंभग,भावगीत गायन करत नाचत नाचत भक्तांनी दिंडीचा आनंद घेतला या प्रसंगी शिरपुर वरवाडे नगर परिषद माजी नगरसेविका सौ.चंद्रकला संतोष माळी,वारकरी  साहित्य परिषद महाराष्ट्र शिरपुर ता.अध्यक्ष संजय पाटील अर्थेकर,वारकरी बाळासाहेब पाटील करवंदकर,वारकरी अशोक सोनार शिरपुरकर,गणेश महाराज संत सावता माळी भजनी मंडळ सदस्य सागर माळी,दगडु माळी,भुषण माळी दिलीप बेलदार,रामलाल माळी,संतोष गोसावी,गणेश महाराज,तुकाराम नाना,रावसाहेब पाटील,महात्मा फुले पुतळा जवळुन बाजारपेठ खंडेराव मंदीरापर्यंत पायी दिंडीचे प्रस्थान झाले तसेच पंढरपुर वारीला जाणार्‍या भक्तांना मोफत मेडीसीन (गुरुकृपा मेडीकल) प्रशांत बापु माळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले पखवा वादक रामेश्वर पाटील यांचे ही सहकार्य लाभले 

पंढरपुर वारी पायी जाणारे भक्त — 

ह.भ.प.आक्काबाई माळी,लटकनबाई माळी,कपुबाई माळी,बबनबाई राजपुत,व्दारकाबाई माळी,केवलबाई माळी,रत्नाबाई माळी,निर्मलाबाई माळी,कमलबाई माळी,उषाबाई पाटील,हिराबाई माळी,कल्पनाबाई माळी,सुनंदाबाई माळी,सकुबाई माळी,
गंगाबाई भोई,शिवाजी महाराज,टिला भोई,पाडुरंग माळी,समाधान माळी,
सुरेश महाजन,छोटु पाटील,अजित परदेशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध