Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ५ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पिंपळनेर येथे उत्साहात संपन्न....!
माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पिंपळनेर येथे उत्साहात संपन्न....!
पिंपळनेर प्रतिनिधी– पिंपळनेर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर व अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पिंपळनेर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक व केंद्रीय अध्यक्ष मा.श्री.सुभाषजी बसवेकर साहेब लाभले. तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपळनेर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा.श्री.सचिनजी साळुंखे साहेब, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा.श्री.सुरेंद्रजी दादा मराठे साहेब ,कर्म.आ.मा.पाटील विद्यालयाचे माजी आदर्श प्राचार्य मा.श्री.अे.बी. मराठेसर,महासंघाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा.श्री.महेश पाटील साहेब( नाशिक) ,महासंघाचे कार्यकारणी सदस्य मा.श्री.साहेबराव वाघ साहेब (मालेगाव),महासंघाचे धुळे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.पुनमचंद मोरे साहेब व पिंपळनेर शहराचे सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.पी.एस.दादा साहेब हे होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेरचे कार्याध्यक्ष श्री.प्रविण थोरात यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.मा.श्री.सुभाषजी बसवेकर साहेबांनी प्रशिक्षण शिबिरात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना येणाऱ्या विविध अडचणी त्यावरील कायदेशीर उपाय योजना व कार्यपद्धती,आदर्श माहिती अधिकार कार्यकर्ता कसा असावा, कायद्याअंतर्गत येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी त्यासाठी शासन दरबारी करावा लागणारा पाठपुरावा, कायद्यातील आवश्यक बदल,माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या, द्वितीय अपील निर्धारित कालावधीत सुनावणी होण्यासाठी आवश्यक असलेले नियमावली, कायद्याचे पालन न करणाऱ्या जन माहिती अधिकारी व आपलीय अधिकाऱ्यांवर होणाऱ्या दंडात्मक कारवाईची रक्कम शुल्कात वाढ करणे, माहिती अधिकार कार्याचे संरक्षण संवर्धन व जनमानसात प्रसिद्ध करणे यासारख्या इतर अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयांवर व्यापक चर्चा संपन्न होऊन आवश्यक विषयांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याबाबत चर्चा संपन्न झाली.
यावेळी उपस्थित जेष्ठ माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याच्या प्रभावीपणे वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमावली व तांत्रिक बाबींबद्दल मार्गदर्शन केले.
संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी माहिती अधिकार हा एक कायदा नसून तो एक जनसामान्यांच्या हक्क आहे आणि त्यातूनच देशात क्रांती घडू शकते. सामान्य माणसाने आपली हक्क जागृत राहून बजावले तर राज्यकर्ते व नोकरशाही यांच्यावर सहज अंकुश ठेवता येऊ शकतो. त्याच्यासाठी माहिती अधिकार चा प्रामाणिक आणि प्रभावी वापर सामान्य नागरिकाला करता आला पाहिजे. यासाठी योग्य ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देऊन आपण समाजात जास्त लोकांना माहिती अधिकार कायद्याबाबत जनजागृती करून जागृत केले पाहिजे व संघटना मजबूत करून व्यापक लढा दिला पाहिजे. सरकार पातळीवरून बदल करण्याच्या नावाखाली माहिती अधिकार कायद्याचा प्रभाव कमी करण्यासाठी जे काही षडयंत्र होत आहेत त्याला विरोध दर्शवून सक्षम आणि प्रभावी असा कायदा टिकवण्यासाठी व त्याच्या संरक्षणासाठी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रशिक्षण शिबिरासाठी धुळे, नंदुरबार ,जळगाव व नाशिक या चार जिल्ह्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यात -श्री. महेश पाटील,श्री. सुभाष दराडे,श्री.माधवराव दोरीक,श्री. हिरालाल कोळी,श्री.पंकज पाटील,श्री. पंढरीनाथ कन्हुर,श्री.सोनु माळी, अॅड.विशाल मावळे, मुजमीन शेख,श्री. महेंद्र जाधव,श्री. कृष्णा शेटे, भिमाबाई गांगुर्डे,श्री.शरद मराठे,श्री. मधुकर पाटील,श्री. प्रमोद गोलेचा, सौ.जयश्री गोलेचा,श्री. संतोष तडवी,श्री.देवानंद ठाकूर, अनिता सापटे,श्री.राजेश बावळेकर,श्री.कुशाल वसावे,श्री. जयेश बागुल,श्री.अजय अहिरे,श्री. गणपत ठाकरे,श्री. दारासिंग ठाकरे,श्री. सईद कुरेशी,श्री. हेमंत वळवी .इत्यादी उपस्थित होते. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पिंपळनेर मार्फत उपस्थित सर्वांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री .अनिल महाले सर यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.प्रविण थोरात, श्री.कैलास भदाणे,श्री. रोहिदास सावळे,श्री. हंसराजजी शिंदे,श्री. रावसाहेब शिंदे, श्री. दिनेश भालेराव, श्री. प्रमोद जोशी, श्री.प्रशांत कापडणीस,श्री.चंद्रकांत अहिरराव, श्री.लक्ष्मीकांत अहिराव, श्री. पराग महाजन, श्री. अनिल महाले,श्री. किरण शिनकर, श्री.मुकुंद खैरनार, श्री. राजेंद्र एखंडे, श्री. अरुण गांगुर्डे, श्री. उमेश गांगुर्डे,श्री. कन्हैयालाल गांगुर्डे, श्री.धनंजय देवरे,श्री. सोमनाथ बागुल,श्री.हेमंत पाटील, श्री.राजेंद्र भदाणे, श्री. निशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा