Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव स्टेट बँकेवरीलं दरोड्यातील आरोपी अटकेत....!! शालकाने मेव्हण्यासाठी केलेला प्रयत्न फसला ; फौजदारानेच बँक लुटली
जळगाव स्टेट बँकेवरीलं दरोड्यातील आरोपी अटकेत....!! शालकाने मेव्हण्यासाठी केलेला प्रयत्न फसला ; फौजदारानेच बँक लुटली
जळगाव (प्रतिनिधी) - शहरात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या झालेल्या बँक लुटीचा उलगडा झाला आहे. निलंबीत फौजदार असलेला मेव्हणा आर्थिक अडचणीत असल्याने त्याला आयडियाची कल्पना सांगत स्टेट बँकेतील शिपाई शालकाने त्यांचा हा गेमप्लान यशस्वी करून काशीबाई कोल्हे शाळेबाजूची स्टेट बँक लुटली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
बँकेत प्रत्यक्ष ही लूटमार करून सोने व रोख रक्कम पळवून नेणाऱ्या दोन्ही आरोपींनी अगदी ठरल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे निलंबित फौजदार शंकर जासक याच्या घरी पोहोचती केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.पोलीस अधीक्षक एम. राजकुमार,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या खळबळजनक बँक लुटीचा गुन्हा शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना सोबत घेत तपासाची चक्रे फिरवली होती.
उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित,परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी व आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा या तपास पथकात सहभाग होता. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिका माता मंदिर शाखेचे व्यवस्थापक व बँकेच्या अन्य कर्मचाऱ्यांची हरतर्हेने चौकशी केल्यावर सुगावा लागला.याच बँकेतील शिपाई मनोज सूर्यवंशी याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी झाली. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे की माझा मेव्हणा शंकर जासक (निलंबित फौजदार, रायगड ) व त्याचे वडील रमेश जासक यांच्या संगनमताने आम्ही हा कट रचला होता.
पोलिसांच्या पथकाने कर्जत येथे जाऊन निलंबित फौजदार शंकर जासक याला ताब्यात घेत चौकशी केली.त्यावेळी स्पष्ट झाले की रायगड पोलीस दलातील निलंबित फौजदार जासक हा ऑक्टोबर २०२१ पासून नोकरीवर गैरहजर आहे. शंकर जासकच्या पत्नीचा भाऊ मनोज सूर्यवंशी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिंका माता मंदिर शाखेत करार तत्वावर शिपाई म्हणून काम करतो. या तिघांनी हा बँक लुटीचा कट रचला होता.जळगावातील बँक लुटीतील रक्कम आणि सोने पोलिसांनी कर्जत येथून जप्त केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रा.महेंद्र तुळशिराम खेडकर: कला, शिक्षण आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. कला आणि संस्कृतीच्या प्रांगणात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, जी केवळ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यात आरोपी चंद्रशेखर नामदेव सपकाळे (वय 33 वर्ष,रा. पुनगाव ता. चोपड़ा हल्ली मु. देवगांव ता. चोप...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा