आज विद्यालयाचे अनेक माजी विद्यार्थी वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.याचा विद्यालयाला आणि संस्थेला,गावाला सार्थ अभिमान आहे. तालुक्यात ग्रामीण भागातून सेमी माध्यमाचे शिक्षण देणाऱ्या मोजक्याच शाळा आहेत.त्यापैकी आमची एक आहे. सर्व उत्तीर्ण व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले नाव,आई वडिलांचे नाव, गावाचे नाव,शाळेचे नाव उज्वल करावे पालकांनी मुलांन बरोबरच मुलींना देखील चांगले शिक्षण दिले पाहीजे.मार्गदर्शक शिक्षकांचे - यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा . - अँड सुभाषराव मोरे.
Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ जून, २०२३
माणिकबाबा विद्यालयात दहावी- बारावीतील गुणवंतांचा सत्कार...
परंडा (राहूल शिंदे)दि.३ तालुक्यातील शेळगाव येथील माणिकबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या परीक्षेत सेमी माध्यमाचा १००टक्के तर विद्यालयाचा निकाल ९७.८२ टक्के लागला आहे.यांमध्ये बारावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत. ९७.८७ टक्के निकाल लागला आहे.विद्यालयातून प्रथम क्रमांक देशपांडे स्वराज संदीप ९५.२०%, द्वितीय क्रमांक मोहळकर साक्षी आजिनाथ ९४.८०% , तृतीय क्रमांक देवरे साक्षी नाना ९४.४०%.
तर बारावी बोर्ड परीक्षाचा निकाल ९७.४०टक्के लागला आहेे.यात विद्यालयातून व केंद्रातून प्रथम सय्यद मुस्कान सलीम व वाघमारे ललिता उमेश ८७.५०%, द्वितीय शिंदे अश्विनी शिवाजी ८१.८३%, तृतीय वाघमारे अपर्णा योगेश ७५.६६% यांनी यश मिळवले आहे.वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.यावेळी अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे जेष्ठ नेते तथा संस्थपक अध्यक्ष अँड. सुभाषराव मोरे,तर प्रमुख पाहुणे म्हणून शेळगावचे सरपंच विष्णू शेवाळे हे होते.
बाळू कुलकर्णी व विद्यालयाचे प्राचार्य गुरुदास काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या, यावेळी परदेशी सर,भाऊसाहेब शेवाळे हनुमंत हुरकुडे ,सुभाष जगताप , युवा नेते विलास मोरे ,बाबुराव दैन, मोठ्या संख्येने ग्रामस्थ,पालक, विद्यार्थी व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिंगाडे सर, गरड सर, सूत्रसंचालन कुमटकर सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पठाण सर यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा