Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १७ जून, २०२३

ग्रामपंचायत- गौऱ्या येथील नागरिकांनी मा.ना.श्री.आमशा दादा पाडवी साहेब, आमदार यांच्याकडे ग्रामसेवकाची तक्रार...



ग्रामपंचायतीत मनमानी कारभार,
आमदारांपुढे ग्रामस्थांनी मांडले गाऱ्हाणे सही-शिक्का देण्यास टाळाटाळ व अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष

धडगांव- (प्रतिनिधी)- गौऱ्या ता.धडगांव येथील ग्रामपंचायतीत मनमानी कारभार होत असल्याची तक्रार आमदार आमशा दादा पाडवी यांच्याकडे ग्रामस्थांच्या व्यथा,
ग्रामपंचायत गौ-या येथील समस्या मांडल्या.अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही शासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.गौ-या हे गाव आजही मुलभूत सुविधांपासून वंचित आहे.एकंदरीत गौ-या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भेटत नाही.सही-शिक्का घेण्यासाठी फोन केला तर  कोणत्या कागदावर सही-शिक्का घेणार आहात हे आधी विचारले जाते.सही-शिक्का देण्यास टाळाटाळ व हेराफेरी,उडवा- उडवीचे उत्तरे देत,वेळकाढुपणा करतात.
माझ्याकडे अतिरिक्त ग्रामपंचायती असल्याचे सांगुन,नेहमी हेलपाटे मारायला लावतात.सर्वसामान्य नागरिक हताश होऊन परत जातात. सबंधित ग्रामसेवक यांचे कार्यालय कुठे आहे.

हे देखील सर्व सामान्य नागरिकांना माहित नसते.जर ठरावावर किंवा कागदपत्रावर सही-शिक्का घ्यायचे आहे असे सांगितले की,सरपंच यांना भेटा.....!!असे म्हटले जाते.परंतु सबंधित ग्रामसेवक- पाटील यांना आपण त्या ग्रामपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी असल्याचा विसर झालेला आहे. 

दुजाभाव करून त्रास देण्याचे काम होत आहे.मागील ०१ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ग्रामसभा,व त्याच महिन्याची मासिकसभा देखील घेतली नसतांना सभा झालेली होती असे सांगितले जाते.परंतु ग्रामसभा ही बंद दाराआड फक्त प्रोसिडिंग बुक लिहून घेण्यापुरती मर्यादित नसते.  मागील दहा वर्षांच्या कारकीर्दीत देखील मनमानी पद्धतीने कामे झालेली आहे.व सर्वसामान्य नागरिकांना अंधारात ठेवण्याचे कामे करित आहे.तसेच आजही त्याच पद्धतीने कार्य सुरू आहे. सबंधित अधिकारी या गावातील नागरिकांच्या समस्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित आहे. तसेच महिलासभा घेण्याचे बंधनकारक असतांना देखील महिला सभाही होत नाही.आणि ग्रामसभा ही गावाच्या सार्वजनिक ठिकाणी घेत नाही.अगदी मनमर्जीने असुरक्षित ठिकाणी ग्रामसभा होते.

व गावातील नागरिकांच्या समन्वयाने ग्रामसभेत विषय होत नाही. विकासात्मक कार्य करतांना समन्वय व पारदर्शी कारभार करणे आवश्यक असते. शासनाच्या अटी-शर्थीनुसार कामे व्हावे म्हणून ग्रामस्थांनी मा.ना.श्री.आमशा दादा पाडवी साहेब यांच्या लक्षात आणून देत व आम्हास समस्या सोडविण्यासाठी आश्वासन दिले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध