Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ जुलै, २०२३

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई...! 3 गावठी कट्टे आणि 6 जिवंत काडतूस जप्त...!



चोपडा प्रतिनिधी:- चोपडा तालुक्यातील हातेड-लासूर रस्त्यावर चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील सराईत गुन्हेगार श्याम नामदेव चव्हाण व समीर शुभान सय्यद यांच्याकडून गावठी कट्टे व सहा जिवंत काडतुसे जप्त केल्याची घटना दि.10 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती. 

त्याआधारे, हातेड- लासूर रस्त्यावर एका दुचाकीवरून (एमएच 19 / बीवाय 3413) मध्य प्रदेशातील पारउमर्टी येथून चाळीसगावला जात असताना श्याम नामदेव चव्हाण उर्फ सॅम (24),समीर शुभान सय्यद (23, दोघे हिरापूर,
ता.चाळीसगाव) यांच्याकडून पोलिसांनी 1 लाख 5 हजार किमतीचे दोन गावठी कट्टे, 3 हजार किमतीचे सहा जिवंत काडतुसे, पन्नास हजार किमतीची दुचाकी असा एकूण 1लाख 58 हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे,पोहेकॉ लक्ष्मण शिंगाणे, राकेश पाटील,किरण धनगर,पोना किरण पाटील,पोकों दिलीप पाटील यांनी केली आहे.तपास पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध