Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ११ जुलै, २०२३

नाशिक जिल्ह्यातील डाळिंब पिकासाठी पी.एम.बायोटेकचे तेल्या रोगावर नवीन तंत्रज्ञानावर आधारित जैविक औषध ऑल राउंडर शेतकऱ्यांचा सेवेत



आपल्या उत्तर महाराष्ट्रचा जो भाग आहे त्यात मुख्यत्वे करून हे तालुके डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहेत कळवण,सटाणा,नामपूर,मालेगाव,देवळा,नाशिक सोलापूर सांगली हे डाळिंब हे सुरुवात १९८५ पासून लागवड चालू झाली होती,त्यावेळी गणेश नावाची जात खूप प्रचलित होती,काहीच स्प्रे कीवा लिक्वीड मारण्याची गरज नव्हती एवढी,फक्त पाकोळी हे खूप त्रास देत होती.नंतर १९९१ मध्ये भारत मध्ये जागतीकरण (Globalization) ची सुरुवात झाली,हळू हळू बाहेर परदेशी कंपनी या वेग वेगळ्या ग्रेडची खते,रासायानिक औषधे घेऊन भारत बाजारात आल्यात,मोठया प्रमाणात डाळिंब बागेसाठी सरास वापर सुरू झाल्याने, जमिनीतील जिवाणू क्षमता ही लय पावत चालली व हानिकारक तेल्याचे/मर चे बुरशी हे बागांमध्ये जास्त जास्त वाढत आहेत,त्यामुळे डाळिंबाचे आयुष्य हे पहिले २०-३० वर्ष होते,आता ते ५-७-१० वर्ष राहिले आहे.
कारण Xanthomonos auxonopodis punicea हा जिवाणू १९५४ मध्येच माती मध्येच शोधला गेलेला जिवाणू असून,तो कुठेही घ्यायला जायची गरज नाही कीवा कोणी आपल्या बागेत आले म्हणून तो घेऊन आला असे नाही,हा गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहे डाळिंब बागामध्ये ,पण xanthomonos हा जमिनीतून ॲक्टिव करून घेतला आहे मोठ्या प्रमाणात लिक्वीड च ग्रॅड,तणनाशक वापर व रासायनिक औषधांचा भडिमार यामुळे प्रत्येक पिकात हा तेल्या चा जिवाणू हे सापडतात त्यावर पी एम बायोटेकने नवीन तंत्रज्ञानावर आधारित ऑल राउंडर हे जैविक औषध तेल्या रोगावर प्रभावीपने करते असे कंपनीने सिद्ध करून दिले आहे डाळिंब,शेवगा,लिंब,संत्रा,मिरची,टोमॅटो पपई इतर फक्त नाव ही वेग वेगळी आहेत.
तेल्या येण्याची महत्वाची ३ करणे त्या मध्ये
१) सूत्रकृमी जो तणनाशक वापर केल्याने मोठ्या प्रमाणत हा वाढलं आहे.यापुढे तणनाशके देखील जैविक मार्केटमध्ये आणण्याचे काम पी एम बायोटेकने ऑरगॅनिक ग्लायफोसेट शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे
२) बागेतील आद्रता हवे मार्फत तेल्या हा पसरतो आहे,त्यामुळे दाट झाडे,कमी अंतर,कमी सूर्यप्रकाश,हवा खेळती न राहणे
३) खोड हे आपले पोट आहे पण याकडे कोणाचेही लक्ष्य नाही,महागडी बुरशीनाशके शिल्लक मारू,पण खोडावर एक सुद्धा स्प्रे न मारणे कीव कंटाळा करणे यातूनच सर्व रोग/आजार हे झाडामध्ये बळावतात असे मला वाटते.
आज जे शेतकरी १०-२०-५०-१ कोटी कमवत आहेत,त्यांच्या प्रॅक्टीस आपण बघा,जे शेतकरी बांधव ना यामधील गूढ समजले आहे,ते कोणाला सांगत नाही हा त्यांचा संकुचितपणा कीव कोणाला मोठे न होऊ देणे,मला कोण बद्दल आक्षेप नाही.परंतु
पी एम बायोटेकची ऑरगॅनिक दर्जेदार उत्पादने वापरून तेल्या/मर साठी शेतकरी बांधवांचे ट्रेनिंग/प्रशिक्षणहे घेतले पाहिजे डाळिंब प्लॉट मधील त्रुटी,रेस्ट बहार मधील कामे, सूत्रकृमी व्यवस्थापन,जैविक खते व्यवस्थापन व जैविक स्लरी/खते नियोजन या बदाल संक्षिप्त माहिती प्रसार झाला पाहिजे,नाहीतर आपल्या महाराष्ट्र मधून डाळिंब च क्षेत्र हद्दपार होत चालले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध