Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २१ जुलै, २०२३

शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला असून होणाऱ्या परिणामास स्वतः प्रशासन जबाबदार



महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व मा.पर्यावरण मंत्री युवासेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे युवासेना सचिव वरूण सरदेसाई व शिवसेनाचे धुळे संपर्कप्रमुख अशोक धात्रक साहेब तसेच धुळे ग्रा.जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व युवासेनाचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी यांचे मार्गदर्शनाने आज दि.21-07-2023 शुक्रवार रोजी शिरपूर शहरातील व तालुक्यातील गरीब गरजू लोकांना रेशनचा फार मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. 

म्हणून आज शिवसेना उ.बा.ठा.गटातर्फे युवासेनेच्या वतीने मा.तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून विविध मागण्या करण्यात आल्या त्यात प्रमुख मागण्या म्हणजे काही लोकांच्या रेशन कार्ड वर शिक्के नाहीत तसेच काही लोकांचे रेशन कार्ड मध्ये नावे आहेत पण ऑनलाईनमध्ये नाव येत नाहीयेत आणि याचा जाब विचारल्यावर प्रशासनाकडून उत्तर दिले जाताय की  तुमची नावे ऑनलाईन होणार नाहीत  कारण राज्य सरकार कडून कोठा वाढवलेला नाही अशी उत्तरे देऊन आपल्या कडून सामान्य गोर - गरीब नागरिकांचे हाल होतायत तसेच बाकी नागरिक रेशन कार्ड धारक असून देखील व्यवस्थीत रेशन पुरवठा होत नाहीये.या वरील सर्व मागण्यांकडे योग्य रित्या लक्ष घालून शासनाकडे कोठा वाढवण्याची तसेच नवीन नावे समाविष्ठ करण्यासाठीचे निवेदन आज शिवसेना-युवासेनेच्या माध्यमातून शहर युवा
अधिकारी बबलू शेख यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसीलदारांकडे केली आहे तसेच मागण्या पूर्ण न केल्यास शिवसेना स्टाईलने तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला असून होणाऱ्या परिणामास स्वतः प्रशासन जबाबदार असेल असे देखील ठणकावून सांगण्यात आले आहे. 

याप्रसंगी शिवसेनाचे धुळे ग्रा. उपजिल्हाप्रमुख भरत राजपूत,
उपजिल्हा संघटक विभा जोगराणा उपतालुका प्रमुख अभय भदाणे पिंटू शिंदे युवासेना जिल्हा समन्वयक अनिकेत बोरसे म.वा.सेना जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील युवाउपजिल्हा अधिकारी मयूर पाटील युवातालुका अधिकारी चेतन मोरे आरोग्य शहर समन्वयक रेहान सर युवाउपतालुका प्रविण सोनवणे वाजीद मलक,,जावेद शेख, आसिफ,इरफान मंसूरी,आदिल,मोबीन पठाण ,करीम,शाहरूख,इमरान बागवन,शाहिद, साहील,अरशद, अरबाज शेख ,अज्जू ,शाहीद शाह,आवेस, शोएब,साहील,जमिल, रेहान,परवेज आदी.शिवसैनिक उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध