Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २१ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी...! शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील संशयितांना घेतले ताब्यात....!
शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कामगिरी...! शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील संशयितांना घेतले ताब्यात....!
शिरपूर प्रतिनिधी:- मध्यप्रदेश राज्यातून शस्त्रसाठा घेऊन जाणाऱ्या दोन संशयितांना शिरपूर तालुका पोलीसांनी शिताफीने पाठलाग करुन पकडले आहे.त्यांच्या ताब्यातून मॅगझीनसह चार बनवाट पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत.दोन्ही संशयित सातारा जिल्ह्यातील असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांना गोपणीय माहिती प्राप्त होती की दोन दाढी असलेले संशयित पिस्तूल घेऊन शिरपूरकडे जात आहेत.सा.पोलीस निरीक्षक खलाणे यांनी तात्काळ उपस्थित पोलीसांना माहिती देत कारवाईच्या सुचना दिल्या.मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचला असता दोन इसम संशयितरित्या दिसून आले त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता दोघेही फरार होत होते.
पोलीसांनी शिताफीने पाठलाग करत दोन्ही संशयितांना ताब्यात घेत अंगझडती घेतली असतांना त्यांच्याकडे मॅगझीनसह चार बनवाट पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे मिळुन आली.त्यांची नावे विचारली असता निलेश गायकवाड आणि मनिष सावंत रा.कराड जि.सातारा असे सांगितले दोघांना ताब्यात घेत शिरपूर तालुका पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येणेप्रमाणे गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आल्याने सदर आरोपीतांविरुध्द शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात दि. २१/०७/२०२३ रोजी पोकों/१७ इसरार फारुकी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्याने गु.र.नं. १६६/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास पोसई/कृष्णा पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय अधिकारी सचिन हिरे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा. पोलीस निरीक्षक जयेश खलाणे, उपनिरीक्षक संदीप पाटील,सुनील वसावे, मंगला पवार,संदिप ठाकरे, संजय भोई,योगेश मोरे,संतोष पाटील, इसरार फारुकी आदीं उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा