Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेतकऱ्यांच्या बँकेत शिरपूर तालुका बरोबरच जवळच्या तालुक्यातील विनापरवाना सावकारी सुरू असल्याची दाट शक्यता...!
शेतकऱ्यांच्या बँकेत शिरपूर तालुका बरोबरच जवळच्या तालुक्यातील विनापरवाना सावकारी सुरू असल्याची दाट शक्यता...!
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्यातील नामांकित शेतकरी बँकेतील शिरपूर तालुक्यातील सध्या गाजत असलेला बचत घोटाळा प्रकरण.यात बँक कर्मचाऱ्यांनी बचत गटाच्या पैशांवर शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी विनापरवाना सावकारी करून व्याज रूपाने खाले.नेमके अशाच प्रकारे शिरपूर तालुक्याच्या जवळच्या तालुक्यात देखील शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी व्याज रूपाने खाऊन बळीराजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन स्वतःचा खिसा भरण्याचा काही लुटारूंचा प्रयत्न काही मागील दोन-तीन वर्षापासून सुरू असल्याची कुण-कुण आमच्यापर्यंत पोहोचले आहे.
इतकेच नव्हे तर शिरपूर तालुक्यातील घडलेला बचत गट घोटाळ्यानंतर अभ्यासू व बँकेच्या दुखी आत्म्यांकडून आमच्या तालुक्यात पण जरा लक्ष द्या.याहीपेक्षा बरेच काही तुम्हाला मिळेल असे दबक्या आवाजात आमच्या कानापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न होत आहे.
इतकेच नव्हे तर राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज असताना व सातबारा उता-यावर इतर बँकेचा बोजा नोंद असताना देखील आमच्या बँकेतून कर्ज दिले जात आहे अशा प्रकारे झालेले कर्ज वाटपाचे प्रकार देखील आमच्या तालुक्यात घडले असल्याचे या दुखी आत्मांकडून आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे.व त्याचा आता आम्ही तुमच्या स्थानिक प्रतिनिधींमार्फत शोध घेणे सुरू करत आहोत.
(वाचा सविस्तर पुढील अंकात )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा