Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १९ जुलै, २०२३

श्री.प्रविणकुमार बाविस्कर यांना राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार प्रदान...!



जळगांव:-अखिल भारतीय कोळी समाज (रजि.) नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र प्रदेश जळगाव जिल्हा अध्यक्ष श्री.प्रविणकुमार दंगल बाविस्कर सर यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना दिनांक 16/7/2023 रविवार रोजी टोकरे कोळी युवा मंच शहादा तर्फे सन 2023 चा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
      
21 मे 2023 रोजी जळगांव येथे अखिल भारतीय कोळी समाज संघटने मार्फत आयोजित आदिवासी कोळी समाजाचा प्रथम सामूहिक विवाह सोहळा यशस्वीरित्या संपन्न केले आहे.
     
जळगांव जिल्ह्यात सन 1993 पासून प्रविणकुमार बाविस्कर सर सामाजिक कार्य करीत आहेत अखिल भारतीय कोळी समाज संघटनेतर्फे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.
गुलाबरावजी पाटील,अ.भा.को.स.प्रदेश अध्यक्ष श्री.परेशभाई कांती कोळी, प्रदेश सचिव अनिल दादा नंन्नवरे, गोपाल शेठ नंन्नवरे, धन्यवाद साळुंखे, सुनील नंन्नवरे, सुखदेव रायसिंग, रामचंद्र सोनवणे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध