Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २२ जुलै, २०२३

पळासनेर घटनेतील अपघातात कोळशापाणी येथील मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत...!



शिरपूर प्रतिनिधी:- सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीला छेद आ.भाई साहेब अमरीशभाई पटेल व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल साहेब यांच्या प्रयत्नाने १८ दिवसाच्या आत पळासनेर घटनेतील अपघातात कोळशापाणी येथील मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत केली.

घोषणा नव्हे तर थेट आ.काशीराम पावरा व माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल साहेब यांनी आज कोळशापाणी येथे जावून ५ लाखांचा धनादेश दिला कुटूंबियांकडे सुपूर्द केला.म्हणूनच आ.भाई साहेब व भूपेशभाईंचा अभिमान वाटतो.शिरपूर तालुक्याला कुटूंब मानणारे व प्रत्येकाच्या सुखा-दुःखात सहभागी होत सर्वोतोपरी सहकार्य करणाऱ्या पटेल कुटूंबियांचे मन:पूर्वक धन्यवाद.राजकारण नव्हे तर प्रत्येकासाठी आत्मीयतेने आणि मनापासून पार पाडलेली जबाबदारी हेच अ त्यांच्या कार्याचे अंतिम सत्य आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध