Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २२ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
पळासनेर घटनेतील अपघातात कोळशापाणी येथील मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत...
पळासनेर घटनेतील अपघातात कोळशापाणी येथील मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांना ५ लाख रुपयांची मदत...
आ.अमरिशभाई पटेल,आ.काशिराम पावरा,भूपेशभाई पटेल यांच्या पाठपुरावामुळे कोळशापाणी,पळासनेर येथील मयतांच्या नातेवाईकांना जलद गतीने मुख्यमंत्री सहायता निधी प्रत्येकी 5 लाख रुपयांचे धनादेश वाटप
शिरपूर प्रतिनिधी :- माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा करुन कोळशापाणी, पळासनेर येथील अपघातग्रस्त 9 मयतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधी मार्फत प्रत्येकी 5 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आले.अतिशय जलद गतीने आर्थिक मदत मिळाल्याने नातेवाईकांनी व ग्रामस्थांनी मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
आमदार काशिराम पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्यासह तहसीलदार महेंद्र माळी,बीडीओ एस. टी.सोनवणे यांच्या हस्ते कोळश्यापाणी येथील तेरसिंग डोंगरसिंग पावरा,निशा मुरी पावरा,सुमित्रा पिंटू पावरा,रेश्मा संजय पावरा,पळासनेर येथील सखुबाई प्रतापसिंग गिरासे,कमल गुलाब पावरा,धुळे येथील राजेश पूनमचंद खंडेलवाल, हर्षदा युवराज पाटील अश्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.तसेच घरातील कर्ता पुरुष मयत झालेल्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत 20 हजार रुपये प्रमाणे एकूण 4 मयत झालेल्या कुटुंबातील वारसांना देण्यात आले.त्याच बरोबर संजय गांधी निरार्धार योजने अंतर्गत लाभ देण्यात आला.कोळश्यापाणी व मोहिदा गावातील 11 लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरण करण्यात येऊन विविध योजनांचा लाभ मृतांच्या कुटुंबांना यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रतिनिधी वसंत पावरा,जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी जयवंत पाडवी, शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती के.डी.पाटील, स्विय सहाय्यक अशोक कलाल,पंचायत समिती सदस्य मानसिंग पावरा,संजय गिरासे,सुभाष भाऊ, ग्रामस्थ,भटू माळी मांडळ, ऍड. बाबा पाटील,नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर,मंडळ अधिकारी सुमन पावरा,महसूल सहाय्यक नितीन भोजने,लक्ष्मण गोपाळ,तलाठी किरण चव्हाण,ग्रामविकास अधिकारी सुनीता मोरे,कोतवाल सखाराम भिल,भिलू पावरा,स्विय सहाय्यक सुनिल जैन, स्विय सहाय्यक योगेश्वर माळी, सरपंच छोटू कोळी,परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.
मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर 4 जुलै 2024 रोजी मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्र राज्यात खडी घेऊन जाणाऱ्या (आर जे 09 जिबी 9001) ट्रालाचा अचानक ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जण दगावले होते तर काही जण काही जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले. याटनेची गंभीर दखल घेत विविध स्तरावरून।मदत करण्यात आली.
यावेळी मनोगत व्यक्त करताना तालुक्याचे आमदार काशिराम पावरा म्हणाले, माजी मंत्री अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्यासह मी सातत्याने प्रयत्न करुन पालकमंत्री गिरीष महाजन यांच्याशी तसेच प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अपघातात ग्रस्तांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून तातडीने मदत आम्ही मिळवून दिली आहे. तसेच आज धनादेश वाटप केले. यापूर्वी पटेल परिवार तर्फे प्रत्येकी 30 हजार रुपये व रेशन व्यक्तिगत स्वरुपात देण्यात आले. तसेच अनेक संघटने मार्फत सहकार्य करण्यात आले.प्रशासनानेे देखील लक्ष घालून काम केल्याने त्यांचेही मनापासून आभार मानतो.
यातील एक मयत राजस्थान येथील वाहनावरील क्लीनर असून त्याचे कागदपत्र मिळवून धुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनामार्फत धनादेश दिला जाणार आहे.
जयवंत पाडवी यांनी पटेल परिवारानेे व आ.काशिराम पावरा यांनी केलेल्या तत्पर सहकार्याबद्दल आभार मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा