Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १२ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
सप्तशृंगी गडावर आज सकाळी सात वाजेला बस दरीत कोसळून वीस प्रवासी गंभीर जखणी व एक महिला ठार झाली आहे.जखमींची विचारपूस करताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे
सप्तशृंगी गडावर आज सकाळी सात वाजेला बस दरीत कोसळून वीस प्रवासी गंभीर जखणी व एक महिला ठार झाली आहे.जखमींची विचारपूस करताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे
वणी :- नाशिकच्या सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 1 महिला ठार झाली तर 20 प्रवाशी जखमी झाले.अपघातात आशा पाटील या प्रवाशी अपघातात ठार झाल्या.सकाळी 7 वाजेच्या सुमारास घाटातील गणपती पाईन्टजवळील बस खाली उतरत असतांना अवघड अश्या वळणावर बस घाटात 200 फूट खोल दरीत कोसळली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व चालत बोलत मदत केंद्राच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य राबविले. प्रशासनाच्या यंत्रणेकडून तातडीने मदत कार्य राबविण्यात आले.सदरची बस ही बुलढण्याच्या खामगाव आगाराची मुक्कामी बस होती.अपघाताच्या बसमध्ये चालक व वाहकांसह एकूण 23 प्रवाशी प्रवास करत होते. जखमीवर वणी ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.14 गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.तर 8 रुग्णावर वणीच्या ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहे.जखमीमध्ये 16 प्रवाशी अमळनेरच्या मुळी गावचे आहेत. तर सप्तशृंग गडावरील 4 प्रवाशी आहेत. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करीत तातडीने मदतकार्य राबविण्याचे प्रशासनाला आदेश दिले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा