Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जुलै, २०२३

एक सही शेतकरी हितासाठी...! शेतक-याच्या मोहीमेस उत्स्फ़ूर्त प्रतिसाद...! ( भाग 1)


शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्हातील नामाकिंत शेतक-यांच्या बॅकेतील शिरपूर तालुक्यातील बचत गट घोंटाळा प्रकरणास शिरपूर तालुक्यातील शेतक-यांनी अतिशय मनावर घेतेले दिसत आहे.तरुण गर्जनाने विनापरवाना सावकारी करणा-या शेतक-यांच्या बॅकेतील शेतक-यांना लुटना-या अधिका-यांची नावे,बचत गट व त्या गटामधून त्रयस्त व्यक्तीच्या नावे काढण्यात आलेली रक्कम याबाबत सविस्तर माहिती पुरव्यासह दाखविण्यात आल्या नंतर शेतकरी वर्ग खूपच संतापलेला असून दोषींची तालुकाबाहेर नव्हे तर जिल्ह्याबाहेर बदली करुन मगच सखोल व सविस्तर चौकशी करण्यासाठी शेतकरी बांधव आपले निवेदन मा.राज्यपाल यांच्याकडे देण्यार असल्याने त्यासाठी “एक सही शेतकरी हितासाठी” ही मोहीम सुरु करणार असल्याचे सांगितले होते. त्याबाबत मागील अंकात आम्ही प्रसिध्द देखील केलेले आहे.

“एक सही शेतकरी हितासाठी” ही मोहीम संतप्त शेतक-यांनी सुरु केली असून या मोहिमेस केवळ पहिल्याच दिवशी अतिशय उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळला असल्याचे शेतक-याकडून माहिती प्राप्त झालेली आहे.किंबहुना इतकेच नव्हे तर तालुकाच नव्हे तर नंदुरबार जिल्ह्यातून देखील याबाबत प्रतिसाद शेतक-यांना मिळत असून सदर शेतकरी बॅक आपल्या सर्वाची असून तीला वाचविण्यासाठी व आज तुमच्या तालुक्यात जे घडले ते आमच्या तालुक्यात देखील का घडले नसेल अथवा भविष्यात तसे घडू नये यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी देखील यात सहभागी होण्यास इच्छूक असल्याचे त्यांनी शिरपूर तालुक्यातील शेतक-यांशी बोलणे केले असल्याची माहिती आम्हाला शेतकरी बांधवानी दिलेली आहे.तसेच शेतक-यांना आलेले काही महत्वाचे अनुभव किस्से देखील त्यांनी सांगितले असून ते आपण पुढील अंकात पहावयास मिळतीलच.

( वाचा सविस्तर पुढ़िल अंकात....)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध