Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २० जुलै, २०२३

न्यायालयाच्या कठोर निर्णयाने गुन्हेगारांवर वचक...! प्रकरणाच्या निकाल लागेपर्यंत तालुका बंदी दंगलीतील गुन्ह्यातील आरोपींना दणका...!



शिरपूर प्रतिनिधी – शिरपूर शहरात शिरपूर शहर पोलीस स्टेशनला दाखल दंगलीच्या गुन्ह्यातील आरोपींना धुळे सत्र न्यायालयाने मोठा न्यायालयीन दणका दिला असून या प्रकरणातील आरोपींना सदर प्रकरणाच्या निकाल लागेपर्यंत शिरपूर तालुक्यात प्रवेश बंदी करत अटी-शर्टींसह सशक्त जामीन मंजूर केला आहे.
 
शिरपूर शहर पोलीस स्टेशनला दिनांक 28 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता मोहम्मद या चौक शिरपूर येथे चौकातील रस्त्यावर सार्वजनिक जागी आरोपी हुल्लडबाजी करत असताना त्यांना सदर गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार हे समजण्यासाठी गेल्याच्या राग येऊन त्यांनी सामायिक इराद्याने गैर कायद्याची मंडळी एकत्रित जमून फिर्यादीच्या मुलगा व साक्षीदारांना चाकूने ,लाकडी दांड्याने व दगडाने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 124 /2023 दाखल करण्यात आला होता. शहर पोलिसांनी सदर आरोपींना 29 मार्च व 24 एप्रिल 2023 रोजी अटक करून न्यायालयात हजर केले होते.न्यायालयाने या आरोपींची रवानगी कोठडीत केली होती.मात्र आरोपींनी जामीन अर्ज दाखल केला असता त्यावर सुनावणी पूर्ण होऊन धुळे सत्र न्यायालयाने कठोर टिपणी करत या आरोपींना सदर प्रकरणाच्या कामकाजाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत शिरपूर शहर व शिरपूर तालुक्यामध्ये वावर करण्यास बंदी घातली असून अटी शर्तीसह जामीन मंजूर केला आहे.
 
सदरचा निर्णय ऐतिहासिक असा मानला जात असून या निर्णयामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलीच मोठी चपराक बसली असून न्यायालयाच्या अशा निकालांमुळे अपराध करणाऱ्यांना इशारा मिळाला आहे.

या निकालानंतर शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांनी देखील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्यांची गय होणार नाही तसेच सत्र न्यायालय धुळे यांनी देखील अशा प्रकारे अपराध करणाऱ्या संबंधित पोलीस स्टेशन व तालुका हद्दीत आरोपींना बंदी केल्याने फार मोठी चपराक दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे व सचिन हिरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ए एस आगरकर यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध