Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २० जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
"कानून के हाथ लंबे होते हैं" बलात्कार करुन फरार आरोपी गुजरात राज्यातून शिरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात...!
"कानून के हाथ लंबे होते हैं" बलात्कार करुन फरार आरोपी गुजरात राज्यातून शिरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात...!
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपुर येथील अल्पवयीन मुलीवर
बलात्कार करुन फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला गुजरात राज्यातूं पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.घराबाहेर अंगणात झोपलेल्या अल्पवयीन मुलीच्या तोंडात रुमाल कोंबुन झाडाझुडुपांमध्ये उचलून घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला होता व तेथून तो सुरत फरार झाला होता.अखेर पोलीसांनी त्याला सुरत येथून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर शहरातील सराईत गुन्हेगार दिनेश सुदाम कोळी उर्फ धाप दिल्या याने अल्पवयीन मुलीवर दि 18 रोजी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास बलात्कार केल्याची घटना घडली होती.अल्पवयीन मुलगी घराबाहेर झोपलेली असतांना तोंडात रुमाल कोंबुन उचलून घेऊन झात झाडाझुडुपांमध्ये तीच्यावर लैंगिक अत्याचार केला होता व तेथून तो फरार झाला होता. याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दिनेश सुदाम कोळी उर्फ धाप दिल्या विरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला.शिरपूर शहर पोलीसांकडून त्याचा सर्वत्र शोध सुरू असतांना गुजरात राज्यातील बारडोली येथील गंगाधरा रेल्वे स्टेशन परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
दिनेश कोळी ऊर्फ धाप दिल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यातील विविध जिल्ह्यांसह मध्यप्रदेश व गुजरात राज्यात देखील गंभीर गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण बाहे,गणेश कुटे,संदिप मुरकुटे,हेमंत खैरणार,उपनिरीक्षक छाया पाटील,शोध पथकाचे ललित पाटील,लादुराम चौधरी,मनोज पाटील,रवींद्र अखडमल,विनोद अखडमल,गोविंद कोळी,योगेश दाभाडे,प्रशांत पवार,भटु साळुंखे,सचिन वाघ,आरिफ तडवी व मनोज दाभाडे आदींना केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील धाडणे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.धाडणे नवनिर्वाचित अध्यक्ष पदी श्री दिनेश कृष्णराव अहिरराव व उप अध्यक्ष पदी श्री.ग...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा