Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ जुलै, २०२३
शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक भीषण अपघात,10 जण ठार,24 जखमी...!
शिरपूर प्रतिनिधी:- मुंबई -आग्रा राष्टीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक आज भीषण अपघात झाला. खडी घेऊन जाणाऱ्या भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने दुचाकी, कारला उडवत थेट हॉटेलमध्ये शिरला. या अपघातात 10 जण ठार झाले असून 24 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.जे 09 जीबी 9001 क्रमांकाचा कंटेनर हा मध्यप्रदेश राज्यातून खडी घेऊन जिल्ह्यातील नरडाणा एमआयडीसी येथे येत होता. पळासनेर गावानजीक अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटला. त्यानंतर कंटेनर रस्त्यावरील वाहनांना व नागरिकांना उडवीत थेट हॉटेलमध्ये शिरून उलटला.या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.जखमींना तात्काळ जवळील व शिरपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.जखमींमध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि आमदार काशिराम पावरा दाखल होत घटनेची माहिती जाणून घेतली होती.
दरम्यान पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा