Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ४ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त...
धुळे शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त...
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत...!
तहसीलदार शिरपूर यांच्याकडून मदत पक्षाची स्थापना...!
मुंबई दि.४- धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई- आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयाप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
दरम्यान सकाळी की दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर तात्काळ युद्ध पातळीवर मदत कार्य आणि काम करून सुरू करण्यात आले व जखमींना वैद्यकीय उपचारासाठी पाठवण्याची सोय करण्यात आली. नागरिकांसोबत पोलीस व प्रशासनाने युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केले होते.
शिरपूर तहसील कार्यालयाकडून तात्काळ मदत करण्याची स्थापना.
दि.04/07/2023 रोजी पळासनेर येथे झालेल्या अपघाताची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तहसिल कार्यालय, शिरपूर येथे आपात्कालिन नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात येत असून अपघातातील पीडीतांच्या मदतीकरिता तसेच अपघाताबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती देणेकरिता खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर कृपया संपर्क साधावा / आपणाकडेस असणारी माहिती शेअर करावी.
अधिकार पेंढारकर नायब तहसीलदार 9067790191
श्री.नितीन भोजने (महसूल सहाय्यक ) :- 7385213850 ( व्हॉट्सॲप क्र.)
सायंकाळपर्यंत प्रशासन कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सदस्य दुर्घटनेत नऊ लोकांच्या मृत्यू झाला असून 31 लोक जखमी झाले आहेत.
माहिती खालील प्रमाणे –
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा