Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १ जुलै, २०२३
डॉ.हिनाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रीडा स्पर्धा....
शिरपूर ( प्रतिनिधी ) किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर व कर्मवीर प्रतिष्ठान शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जून २०२३ रोजी संसदरत्न खासदार डॉ.हिनाताई गावित यांचा वाढदिवस संस्थास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.संस्थेच्या क्रीडा विभागाच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धा घेऊन खासदार ताई साहेबांना आरोग्यमय शुभेच्छा देण्यात आल्या. सदर दिवशी क्रिकेट,कबड्डी,खो-खो, व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, स्केटिंग क्रीडा प्रकारांच्या एक दिवसीय स्पर्धा घेण्यात आल्या.क्रीडा स्पर्धांमध्ये विविध क्रीडा प्रकारांच्या ५०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धांचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा नंदुरबार लोकसभा प्रमुख तथा किसान विद्या प्रसारक संस्थचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.प्रातिनिधिक स्वरूपात चिमुकल्या खेळाडूंनी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून ताई साहेबांना वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या. या मंगलमय प्रसंगी किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव श्री निशांत रंधे, कोषाध्यक्ष सौ.आशाताई रंधे, संचालक रोहित रंधे,प्राचार्य डॉ.एस एस राजपूत, उपप्राचार्य श्री विलास चव्हाण, व्यवस्थापक श्री के.डी.बच्छाव,शेखर माळी आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व क्रीडा शिक्षक,प्रशिक्षक व खेळाडू उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत १४ वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक के व्ही टी आर सी बी एस ई स्कूलच्या संघाने पटकाविला तर द्वितीय क्रमांक डॉ.व्ही व्ही रंधे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला मिळाला.१६ वर्षाआतील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक के व्ही टी आर सी बी एस ई स्कूलच्या संघाने मिळविला तर द्वितीय क्रमांक डॉक्टर व्ही व्ही रंधे इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाला मिळाला.कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉक्टर पा रा घोगरे ज्युनिअर कॉलेज शिरपूर तर द्वितीय क्रमांक दे.भ.ज्युनिअर कॉलेज बोराडी संघाने पटकाविला.
खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ.पा रा घोगरे जुनिअर कॉलेज शिरपूर तर द्वितीय क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय शिरपूर संघाला मिळाला. बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट बॉक्सर म्हणून कुमारी नकाशा पावरा तर मुलांमध्ये कुमार नैतिक माळी यास गौरवण्यात आले. स्केटिंग स्पर्धेत मुलांच्या गटात प्रथम क्रमांक कुमार सार्थक पाटील तर द्वितीय क्रमांक हिमांशू पाटील यास देण्यात आला.मुलींच्या स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी स्वरा प्रताळे तर द्वितीय क्रमांक कुमारी पलक वाघ व कुमारी मनस्वी पाटोळे यांना देण्यात आला.
विजेता खेळाडूंना कर्मवीर प्रतिष्ठान शिरपूरचे उपाध्यक्ष हर्षवर्धन रंधे यांच्या हस्ते चषके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या क्रीडा विभागाच्या वतीने डॉ.लिंबाजी प्रताळे, प्रा.राधेशाम पाटील,प्रमोद पाटील, सचिन कुमावत,तारा पावरा,उमेश बोरसे,प्रा.श्री किशोर पाटील,जिनेश पराडके,विजेंद्र जाधव, दीपक पवार, हेमंत शिरसाट,संजय मोते,मुकेश पारधी,कु.पूनम होतवाल आदी क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राकेश बोरसे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. लिंबाजी प्रताळे यांनी व्यक्त केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा