Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ३० जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी.एम.बायोटेकचेच झिंक अथवा सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत आणि फायदे
पी.एम.बायोटेकचेच झिंक अथवा सूक्ष्म अन्नद्रव्याचे मका पिकामध्ये महत्व व वापरण्याची पद्धत आणि फायदे
झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य सर्व पिकांसाठी महत्त्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखले जाते,जे,की पिकाच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी खूप कमी प्रमाणात पण अति महत्वाचे असते झिंक ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याचे पिकांमध्ये खूप महत्त्वाचे कार्य असते जसे की हरितद्रव्याची निर्मिती,एन्झाइम रिॲक्शन,प्रकाशसंश्लेषण,ऑक्सिन ची निर्मिती
झिंक ची कमतरता आपल्या भागातील बऱ्याच जमिनींमध्ये जास्त आहे त्यातल्यात्यात हलक्या ते मध्यम जमिनींमध्ये ती कमतरता जास्त आढळून येते
इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता मका या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात दिसते म्हणजे ह्या पिकाला झिंकची गरज इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांपेक्षा जास्त प्रमाणात लागते व त्यामुळे उत्पादनात 10 ते 15 % ने वाढ होते
अग्रिसर्च निर्मित झिंकॉल हे प्रभावी फार्मूलेशन,फवारणी साठी अतिशय फ़ायदेशीर ठरत आहे
फक्त 20 मिली प्रति पम्प।एकरी 3 ते 4 पम्प ,अतिशय किफायती दरात उपलब्ध आहे।
बरेच शेतकरी मका पिकामध्ये झिंक सल्फेटचा वापर प्रति एकर 10 किलो या प्रमाणात करत असतात, परंतु शेतकरी या झिंक सल्फेटचा वापर इतर स्फुरदयुक्त रासायनिक खतासोबत मिक्स करून करत असतात व त्यामुळे त्या झिंक सल्फेट मधील झिंकचे मोठ्या प्रमाणात स्फुरदयुक्त खतामधील स्फुरद बरोबर स्थिरीकरण होते व तो झिंक पिकांना खूप कमी प्रमाणात उपलब्ध होते
दुसरे म्हणजे बरेच शेतकरी कमी किमतीच्या झिंक सल्फेटचा वापर जास्त करतात, परंतु एक लक्षात घेतले पाहिजे की जेवढे झिंक सल्फेट स्वस्त तेवढे त्यामध्ये जडधातूंचे प्रमाण किंवा अशुद्धता जास्त असतात व त्याचा विपरीत परिणाम जमिनीच्या पोतावर होत असत.
म्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी स्फुरदयुक्त खतासोबत टाळावा जसे की 18 : 46, 10:26:26, 12:32:16, 15:15:15, 24:24:0, म्हणून झिंक सल्फेट चा वापर शेतकऱ्यांनी टाळावा व खालील सोप्या पद्धतीने चिलेटेड पी एम बायोटेकच्याच झिंक चा वापर मका पिकात करावा
झिंक चा वापर मका पिकामध्ये कसा करावा
1. बीज प्रक्रिया :- चिलेटेड स्वरूपातील चिलेटेड झिंक 100 ग्रॅम प्रति तीन ते चार किलो बियाण्यासाठी वापरून बीज प्रक्रिया करावी, ती करत असताना एका पिशवीतील बियाणे एका घमेल्यात ओतावे व त्यामध्ये 100 ग्रॅम चिलेटेड झिंक टाकावे व त्यामध्ये थोडेसे 20 ते 30 मिली पर्यंत पाणी टाकावे, ते चांगले मिक्स करावे व दहा मिनिटे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे. किंवा हे शक्य नसल्यास बियाण्याच्या पिशवीमध्ये 100 ग्रॅम चिलेटेड रिलीज झिंक टाकून त्यामध्ये 20 ते 30 मिली पाणी टाकून पिशवी चांगली हलवून घ्यावी व नंतर ते बियाणे पेरणीसाठी वापरावे.
चिलेटेड (EDTA) पी एम बायोटेकचेच झिंकच का ? चिलेटेड झिंक हे EDTA युक्त चिलेटेड सूक्ष्मअन्नद्रव्य आहे जे की उत्कृष्ट स्प्रे ड्राईंग टेक्नॉलॉजिने बनवलेले आहे
चिलेटेड झिंक एका एकर साठी 250 ते 500 ग्रॅम जर वापरले तर इतर झिंक युक्त खते वापरण्याची गरज नाही जर बियाण्याला बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली असेल किंवा करणार असेल तर त्या बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची कार्यक्षमता वाढवण्याचे काम चिलेटेड झिंक करत.चिलेटेड झिंक चे बियाण्या सोबत कोटिंग असल्यामुळे शंभर टक्के मुळीच्या जवळ राहते व पिकाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते झिंक मुळे ऑक्सिन (IAA) ची निर्मिती फास्ट होऊन उगवण जोमदार व हिरवीगार होते कमी प्रमाणामध्ये वापरून सुद्धा जास्त फायदे देणार सुक्ष अन्नद्रव्य आहे.
पी.एम.बायोटेकचे चिलेटेड झिंक EDTA चिलेटेड स्वरूपात असल्यामुळे इतर स्फुरदयुक्त खतांसोबत स्थिरीकरण होत नाही व त्या अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढवते
2. युरिया बरोबर पी.एम. बायोटेकचा झिंक चा वापर करावा
वरील दोघी प्रयोग शक्य न झाल्यास प्रति एकर 250 ते 500 ग्रॅम चिलेटेड झिंक घेऊन ते 5 ते 6 किलो युरिया मध्ये सुरवातीला चांगले मिक्स करावे व नंतर तो 5 ते 6 किलो युरिया उरलेल्या युरिया मध्ये मिक्स करून त्याचा वापर मक्याच्या बुडाजवल करावा.
फायदे :-युरिया बरोबर चिलेटेड (EDTA) रिलीज झिंक ची खूप छान कोटिंग होते. व मक्याला काळोखी येते.
झिंक मुळे मक्याचे दाणे चांगले भरले जातात व वजन वाढते म्हणून उत्पादन वाढते.
युरिया सोबत दिल्यामुळे झिंक ची आणि युरिया मधील नत्राची कार्यक्षमता वाढते
3. फवारणीद्वारे झिंक चा वापर
शेतकरी जेव्हा मक्यावर तणनाशक फवारतो किंवा फॉल आर्मी वर्म (FAW) अळीसाठी एखादे कीटकनाशक फवारत असेल तर त्यात झिंक 20 ते 25 ग्रॅम (15 लिटर पाण्यासाठी)फवारणी करावी.
बीज प्रक्रिया, युरिया बरोबर किंवा फवारणीद्वारे किंवा खतातून झिंक चा वापर केल्यास मका पिकावर पी एम बायोटेकचे झिंकची कमतरता येणार नाही व मका पिकाच्या उत्पादनांमध्ये 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होईल
मित्रहो पी.एम.बायोटेक निर्मित उत्पादनाचा एवढ्या साठी आग्रह की आम्ही गुणवत्ते मधे कोठेही तड़जोड करत नाही
तर मग एक वेळा आमचे सुक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते वापरून तर पहा आणि खात्री करा
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा