Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १२ जुलै, २०२३

माजी जि.प.अध्यक्ष धुळे श्री.बाळासाहेब मनोहर भदाणे यांना मातृशोक माजी सरपंच गं.भा.सुशिलाताई यांचे दु:खद निधन



धुळे ता.12 - धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जेष्ठ नेते मनोहर भदाणे यांच्या मातोश्री गं.भा.सुशिलाताई दत्तात्रय भदाणे यांचे वयाच्या 83 व्या वर्षी वृद्धापकाळाने आज दि.12 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता दुख:द निधन झाले. गं.भा.सुशिलाताई ह्या माजी आमदार कै.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या धर्मपत्नी असून माजी पं.स.सभापती अनित भदाणे यांच्या मातोश्री व जि.प.सदस्य राम भदाणे यांच्या आजी होत्या. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.13 जुलै रोजी सकाळी 12 वाजता धुळे येथील मनमाड जीन येथील राहत्याघरापासून निघणार असून अंतविधी कार्यक्रम नगांव येथे आण्णासाहेब द.वा.पाटील शैक्षणिक संकुलात (गंगामाई इंजिनिअरींगच्या प्रांगणांत) करण्यात येणार आहे.
गं.भा.सुशिलाताई दत्तात्रय भदाणे यांनी नगांव ग्रुप ग्रामपंचायतीत सुमारे 45 वर्षे बिनविरोध सरंपच व उपसरपंच पदांची धुरा सांभाळलेली होती. त्यांच्या पश्चात दोन मुल, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या राजकीय, सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवनात त्यांचा मोठा सिंहाचा वाटा होता. स्व.आण्णासाहेब द.वा.पाटील हे शिंदखेडा व धुळे ग्रामीण मतदार संघात सामाजिक व राजकीय काम करत असतांना ताईंनी आपले कुटुंब व शैक्षणिक संस्था यांचा सांभाळ योग्य पद्धतीने केले. त्यांचे जेष्ठ चिरंजीव बाळासाहेब मनोहर भदाणे व अनित भदाणे तसेच स्नुषा सौ.ज्ञानज्योती भदाणे व नातू राम भदाणे आदींना वेळोवेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योग्य असे मार्गदर्शन मिळत होते.गं.भा.ताईं स्वत: शिक्षिका असल्यामुळे त्यांनी परिवारातील सर्व मुला-मुलींना चांगले संस्कार देऊन शिक्षणात उच्च विद्याभूषीत केले. बाळासाहेब मनोहर भदाणे यांना त्याकाळी सिव्हील इंजीनिअरींग, अनित भदाणे यांना एम.बी.ए.,मुलगी डॉ.सौ.संध्या ह्या देखिल एम.डी. पर्यंत शिक्षण करुन आज सर्व मुल-मुली गोर-गरीबांची सेवा करीत आहेत.
ग.भा.ताई ह्या नगांव गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंच असतांना त्यांनी अनेक विकासाची कामे केल्यामुळे व स्व.आण्णासाहेब द.वा.पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे ताई सुमारे 45 वर्षे बिनविरोध सरपंच पदावर विराजमान होत्या. त्यांच्या निधनाने नगांव परिसरासह धुळे व शिंदखेडा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध