Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ जुलै, २०२३

शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाची कामगिरी...! शिरपूर बस स्थानकात प्रवाशांच्या खिशातून पैशांची चोरी करणारा संशयीत मुद्देमालासह जेरबंद,



शिरपूर बस स्थानकावर प्रवाशांच्या खिशातून पैशांची चोरी करणारा संशयीतास शहर पोलीस ठाण्याच्या डी. बी.पथकाने मुद्देमालासह जेरबंद केल्याची कामगिरी केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी सोमवारी दुपारी प्रसारमाध्यमांना दिली आकाश संजय चौधरी रा.किस्मतनगर, हुडको शिरपूर जि.धुळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. 30 जून रोजी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास थाळनेर येथील गोपाल चंद्रसिंग जमादार वय 40 हे शिरपूर बस स्थानकात उभ्या असलेल्या शिरपूर-सूरत बसमध्ये नातेवाईकांना बसवित असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून त्यांचे पॅन्टचे खिशात ठेवलेले ४० हजार रुपये रोख काढून चोरून नेले होते याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांकडून तपास सुरू असतांना पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांनी डी.बी.पथकाचे पोलीस अंमलदारांमार्फत तपासचक्रे फिरवून संशयीताने गुन्हा केल्याची माहिती मिळाली.मिळालेल्या माहिती वरून त्याची अधिक चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुली देत 32 हजार 100 रूपये रोख काढून दिल्याने त्यास अटक केली
सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड,अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे,पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर डी.बी.पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील,लादूराम चौधरी,पोना मनोज पाटील,पोकॉ विनोद आखडमल, गोविंद कोळी,योगेश दाभाडे,प्रशांत पवार,भटू साळुंके, सचिन वाघ तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल,चेतन भावसार व शरद पारधी यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध