Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३ जुलै, २०२३

सुक्ष्म नियोजनाने ‘शासन आपल्या दारी’उपक्रम यशस्वी करुया धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची माहिती



धुळे, दि. 3 राज्य शासनाने ‘शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे सर्व विभागप्रमुखांनी स्क्षूम नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करावा. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले.
शासन आपल्या दारी अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 10 जुलै, 2023 रोजी धुळ्यातील एस.आर.पीएफ बल गट क्रमांक 6 येथील मैदानावर सकाळी 11.00 वाजता होणार आहे. या कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक येथील जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी श्री.जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेशवरी एस. मनपा आयुक्त देविदास टेकाळे, उप वनसंरक्षक नितिनकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्य्म गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्हा प्रशासनातील 27 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला सुमारे 70 सहाय्यक नोडल अधिकारी देखील काम बघणार आहे. निवासी जिल्हाधिकारी नितीन गावडे यांनी शासन आपल्या दारी उपक्रमाबाबत नोडल अधिकारीनिहाय सोपविलेल्या जबाबदारीचे सादरीकरण करुन आढावा घेतला.आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री.शर्मा म्हणाले की, त्या-त्या विभागाचे अधिकारी यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार नियोजन करावे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी येणार्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी पार्किंग, भोजन व पिण्याच्या पाण्याची चोख व्यवस्था ठेवावी,उपस्थित राहणार्या दिव्यांग लाभार्थ्यांची स्वतंत्र्य व्यवस्था करावी. आरोग्यसुविधा उपलब्ध ठेवावी. तसेच जास्तीत जास्त लाभार्थी उपस्थित राहण्यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी कराव  कार्यक्रमाच्या ठिकाणी रोजगार मेळावा तसेच आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करावे.या कार्यक्रमास किमान 12 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याने कार्यक्रमस्थळी डॉक्टरांच्या टीम व रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात यावी, कार्यक्रमाच्या ठिकाणी कृषी, महावितरण, महसूल, कौशल्य विकास, कामगार, जिल्हा परिषद, महानगरपालिका आदी विविध विभागांचे माहितीपूर्ण स्टॉल्स उभारण्यात येणार असून याचे नियोजन देखील व्यवस्थित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध