Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जुलै, २०२३

एक सही शेतकरी हितासाठी...! मोहिमे अंतर्गत शेतक-यांनी कथन केलेले किस्से...!



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील शेतक-याच्या बॅकेतील बचत गट घोंटाळा प्रकरणास योग्य व उचित न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी बांधवानी सुरु केलेल्या “एक सही शेतकरी हितासाठी” या मोहीमेस उत्स्फ़ूर्त प्रतिसाद मिळत असून ठिक-ठिकाणी शेतक-यांना गोळा करुन मोहिमे मागील खरे सत्य समजवून देण्यात येत आहे.यातच काही ठिकाणी त्यांना ऐकावयास मिळालेले किस्से अतिशय मनोरंजक व तितकेच विचार करण्यास भाग पाडणारे असेच आहेत.

“आटे शेतक-यासले कर्ज देवानी बोंबा-बोंब आणि ह्या बॅकवाला सावकरीनां धंदा करतस,माले नविन आणि वंचित म्हनीसन कर्ज द्यावाले पैसा नहीत अस सांग,मग सावकरी कराले ह्या कोठुन पैसा लयतस ! मग आते यासले ठिकाणवर लयणाच पडी ” अश्या गावराण भाषेत मजेशिर शेतकरी सांगू लागले आहेत.यातच आजून दुस-या ठिकाणी एका शेतक-याने खूपच मजेशिरपणे व विचार करण्यासारखी बाब सांगितली आहे.

“मना बाप मरिसन चार वर्ष होई गयात तरी माले मना बापनाच नावर कर्ज मिळी राहीन, मग मी का बर सही करु रे भाऊ !”
अश्याप्रकारचे किस्से ऐकायला मिळाल्यानंतर ह्या शेतक-यांच्या बॅकेची आता कसुनच चौकशी व्हावी असे मात्र काही हुशार शेतक-यांचे म्हणने झाले आहे.

(अजून काही किस्से ... वाचा सविस्तर पुढील अंकात )





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध