Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जुलै, २०२३

साक्री तालुका प्रहार संघटनेच्या वतीने साक्री ग्रामीण रुग्णालयात गरजू रुग्णांना साड्या,फळ,मिठाई, बिसलेरी बॉटल वाटप करण्यात आले



प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ना.बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्ताने साप्ताहिक कार्यक्रम घेण्याचे साक्री तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी घोषणा केली होती त्या संदर्भात ना. बच्चू भाऊ कडू यांचा एक्कावणवा वाढदिवस असल्यामुळे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानत एक्कावण रुग्ण महिलांना साड्या, फळ, मिठाई व पाण्याच्या बिसलेरी बॉटलचे वाटप करण्यात आले असून रुग्णांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले ना. बच्चू कडू यांना रुग्णांनी यशस्वीभवचा आशिर्वाद दिला यावेळी उपस्थित गोसावी समाज उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अशोक गिरी महाराज, तालुका विभाग प्रमुख जयेश बावा, दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष नाना शेलार, शशिकांत अहिरराव, भिला कोळेकर, रामा कोळेकर,प्रदीप सोनवणे, बाबूलाल माळी,धुळू लकडे,भटू वाघमोडे, सुका सरगर,कविता सोनवणे, कोमल पाटील,भास्कर पाटील आदी उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध