Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३

शिरपूर शहर पोलिसांकडून मोठी कारवाई...! सुगंधी तंबाखूसह 40 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त...!



शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशन चा शोध पथकाला एक मोठी कारवाई करण्यात यश आले असून या कारवाईत शहर पोलिसांनी 10 लाख 83 हजार 300 रुपयांच्या सुगंधित तंबाखूच्या मुद्देमाल व 30 लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण 40 लाख 83 हजार 300 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करून दोन आरोपींना जेरबंद करत धडाकेबाज कारवाई केली आहे.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आगरकर यांना दिनांक 19ऑगस्ट रोजी रात्री गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की  राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंदौरकडून धुळेकडे मालट्रक वाहन क्र.आर जे 32 GC -06075असे वाहन जात असून त्यात महाराष्ट्र राज्यात वाहतुकीस व विक्रीस प्रतिबंधीत असलेला सुगंधी तम्बाखुजन्य पदार्थाचा माल भरलेला आहे.त्यामुळे तात्काळ शोध पथकासह शिरपूर टोल नाक्याच्या पुढे,शिरपूर जि.धुळे येथे पंचांसह सापळा लावला असता राष्ट्रीय महामार्ग क्र.३ ने इंटरकडून का मालट्रक वाहन क्र.आर जे ३२GC ६०७५ असे ३.३० वाजेचे सुमारास येताना दिसल्याने सदर मालट्रक वाहनास शिताफीने पकडून सदर वाहनावरील१) चालक साजिद समश्या खान यय २६ रा. घुरावली पोस्ट-उत्तवर ता.हथिन जि. पलवल राज्य हरियाणा तसेच २) क्लिनर ताज 'साहबदिल खान वय २४ रा.घुरावली पोस्ट उत्तावर ता.हथिन जि.पलवल राज्य हरियाणा अशांना सदर वाहनात काय माल भरला आहे विचारपूस करता त्यांनी तांदूळ व इलेक्ट्रीकचा माल भरला आहे बाबत सांगितले तसेच सदर वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या सु तंबाखूजन्य पदार्थाचा वास येत असल्याने वाहनाचा संशय आल्याने सदर मालट्रक वाहनाची पंचासमक्ष तपासणी केली असता वाहनाचे मागील बाजूस तांदुळ माल, इलेक्ट्रीक पी.व्हि.सी.वायर, चायडिंग वायर, इलेक्ट्रीक माल, माऊथ फ्रेशनर असा माल भरलेला दिसला तसेच सदर माला आडोशाला सुगंधी तंबाखुजन्य पदार्थांचा माल भरलेले गोणपाट आढळून आला आहे. या वाहनातून खालील प्रमाणे माल मिळून आला आहे.

१) २,८०,८००/- रू. कि. ची क्लासीक नावाची सुगंधीत तंबाखू भरलेले एकूण ५२ गोणपाट v त्यात सहा कोकण मध्ये पाच किलोग्राम वजनाचे एकूण 312 प्लास्टिक बॅग.

२) २.४०,०००/- रु. कि. ची नावाची सुगंधीत तंबाखू भरलेले एकूण ४० गोणपाट प्रत्येक गोणपाटात ६० प्लॅस्टीक बंग प्रत्येकी ५०० में वजनाच्या एकूण २४०० प्लॅस्टीक बॅग

३) ५,६२,५००/- रु. कि.ची पान बहार कंपनीची सुगंधीत सुपारीचा माल भरलेल्या एकुण १० एनस्टीक गोणपाट प्रत्येक गोणपाटात गोवा प्रत्यक गोणीमध्ये ५ प्लॅस्टीक बॅग त्यामध्ये प्रत्येकी २५ पाऊच असे एकूण २५०० पाऊच प्रत्येक पाकची किंमत २२५/- रुपये

 ४) ३०,००,०००/- रू. कि. चौ मालट्रक क्र. RJ ३२ CGC ६०७५ असा असलेली लाल रंगाची
याप्रमाणे मुद्देमाल व वाहन पोलिसांनी कारवाई करत जप्त केले  मुद्देमाल ताब्यात घेवून सदर बाबत निरीक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय, धुळे यांना पत्रव्यवहार केल्यानुसार अन्न सुरक्षा श्री.के.एच.बावीस्कर हे शिरपूर शहर पो.स्टेला येवुन वरील वाहनाची व वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती सरकारतर्फे फिर्यादीन गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) साजिद समश्या खान ए २६ तसेच २) दिल खान वय २४ दोन्ही रा. पुरानी पोस्ट उत्तावर ता. हथिन जि. पलवल राज्य हरियाणा अशांना अटक करण्याची तजवीत ठेवली आहे.
 
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.संजय बारकुंड, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री किशार काळ न उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपुर शहर पो.स्टे.तसेच डी बी पथकाचे पोहेकॉलस्मीत पाटील, पोहेकॉ कैलास वाघ, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, गोविद कोळी योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भद साक, सचिन बाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, चापोका/जितेंद्र मालचे तसेच होमगार्ड गोपाल अहिरे, मिथुन पवार, राम भिल, चेतन नावर व शरद पारथी अशानो मिळून केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध