Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यांना सकल मराठा पाटील समाजाचे निवेदन...!
गोंडगांव ता भडगांव येथील चिमुकली कु कल्याणी संजय पाटील हिच्यावर अमाणुस कृत्य करुन निर्घुण खुन करण्यात आला होता. या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा पाटील समाज न्याय समितीच्या शिष्टमंडळाने आज तसे निवेदन प्रत्यक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांची भेट घेऊन दिले असता मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी गोंडगांव ता भडगांव येथील पिडीत बालिकेची केस जलदगती न्यायालयात चालविण्यास, व ऍड. उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात येईल असे सांगुन गृहमंत्रींनी स्वतः फोन वर ऍड.उज्ज्वल निकम साहेब यांच्याशी बोलून त्यांच्यावर या केसचे कामकाज करण्याचे सांगितले, व उज्ज्वल निकम साहेब यांनी देखील क्षणाचाही विचार न करता केस चालवण्यासाठी होकार दिला
जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील,पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर अप्पा पाटील यांनी या शिष्टमंडळास सोबत घेऊन मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घालून सविस्तर माहिती दिली या दोन्ही नेत्यांच्या मध्यस्थी मुळे आमच्या शिष्टमंडळास खुपच सहकार्य लाभले त्यांचे कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत.
या शिष्टमंडळा सकल मराठा पाटील समाजाचे खालील बांधव उपस्थित होते
१) श्री सोमनाथ रघुनाथ मराठे पाटील सुरत, मुख्य संयोजक मराठा पाटील समाज न्याय समिती
२) श्री चिंतामण बाजीराव पाटील, पाचोरा ,सह संयोजक मराठा पाटील समाज न्याय समिती
३) श्री भानुदास भागवत पाटील भुसावळ
४) श्री दिलीप हिलाल मराठे धरणगाव
५) श्री मोतीलाल भिला नरवाडे भडगाव
६). भरत अभिमन मराठे थाळनेर
७). विठ्ठल नामदेव मराठे
८) भगवान तलवारे थाळनेर
९) अमृत गयभू मराठे औरंगाबाद
१०) सुनील रघुनाथ मराठे धरणगाव
११) गणेश नंथ्थू चव्हाण नशिराबाद
१२) सुनील राजाराम पाटील ठाणे
१३) मुकेश अशोक पाटील बारडोली
१४) विलास राजाराम पाटील ठाणे
१५) गणेश काशीनाथ पाटील सुरत
१६) डॉ.ई.के.पाटील सुरत
१७) अरुण दिनकर पाटील शिरसमनी
१८) सुनील अर्जून मराठे अंबरनाथ
१९) चंद्रकांत वसंत पाटील चोरवड भोंडन
ह्या उपस्थित सर्व समाज बांधव
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा