Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

शेणपुर गावात भारताचा 76 वा स्वातंत्रता दिवस गावकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.



आज दिनांक 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनाच्या रोजी ग्रामपंचायत शेणपूर येथे स्वातंत्र्यदिना निमित्ताने सार्वजनिक ध्वजारोहणाचा कार्यक्रम शेणपूर गावात उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम ग्रामपंचायत शेणपूर यांच्या आवारात हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी शेणपूर ग्रामपंचायतचे सरपंच श्री. चंद्रकांत काळे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत आवारात ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शेणपूर येथील ध्वजारोहण शेणपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री.दादाजी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.व छत्रपती संभाजी माध्यमिक विद्यालय शेणपूर यांच्या आवारातील ध्वजारोहण हे शेणपूर गावचे प्रतिष्ठित नागरिक,सदन शेतकरी,आदिवासी
बांधव श्री.धर्मा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमात शेणपूर गावचे ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक,महिला भगिनी,ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व त्यांचे सर्व सदस्य वि.वि.कार्य. सह. सोसायटी दक्षिण व उत्तर त्यांचे चेअरमन संचालक मंडळ व जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व कर्मचारी वृंद,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व त्यांचे सर्व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत ग्रामसेवक व त्यांचे सर्व कर्मचारी वृद शेणपूर गावचे पोलीस पाटील,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आशा वर्कर,बचत गटाच्या अध्यक्षा,पत्रकार, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आज भारत देशाचा 76 वा स्वातंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी देखील भारताच्या स्वातंत्र्य दिना बद्दल नागरिकांना संबोधित केले जि.प.मराठी शाळेचा लहान मुलांनी भारताचा स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने देशासाठी शहीद झालेल्या विविध क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी आपले भाषण दिले तद नंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध