Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
माहिती अधिकार अर्जावरील प्रथम अपील न घेणे सहाय्यक निबंध सहकारी संस्था, शिंदखेडा यांच्या अंगाशी येणार...?
माहिती अधिकार अर्जावरील प्रथम अपील न घेणे सहाय्यक निबंध सहकारी संस्था, शिंदखेडा यांच्या अंगाशी येणार...?
प्राप्त माहितीनुसार एका माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी शिंदखेडा तालुक्यातील दरणे व रोहाणे या दोन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या विषयी माहितीची मागणी केलेली होती.राज्यातील सहकारी संस्थांना माहिती अधिकार कायदा लागू नसला तरी संबंधित संस्थेची नोंदणी अधिकारी तथा त्यांचे कनिष्ठ अधिकारी यांना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये जी माहिती उपलब्ध करून घेता येते, मागवता येते, तपासता येते अथवा संस्थेची चौकशी करून त्यावर जबाबदारी निश्चित करता येते अशी कोणतीही माहिती संबंधित संस्थेकडून मागणी करून अर्जदाराला पुरवणे सार्वजनिक प्राधिकरण या नात्याने बंधनकारक आहे.त्यामुळे अर्जदाराने सदर अर्ज हा जन माहिती अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदखेडा यांच्याकडे केलेला होता.
मात्र कायद्यातील तरतुदी व वरिष्ठ आयुक्त कार्यालयीन आदेश/परिपत्रक अथवा कोर्ट निर्णय या सर्वांचा विसर पडलेल्या या अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराचा पुरेपूर वापर न करता व माहिती देण्यास टाळाटाळ करून केवळ स्वतःचा बचाव करणे म्हणून अर्जाचे हस्तांतरण ही सोपी पद्धत माहिती आहे.दिनांक २५/०५/२०१८ रोजीच्या पत्रानुसार अर्जदाराने मागणी केलेली माहिती निबंधकाने संबंधित संस्थेकडे मागणी करून पुरवणे सार्वजनिक प्राधिकरण या नात्याने बंधनकारक असल्याचे अतिशय स्पष्टपणे म्हटले आहे.म्हणजेच सहकारी संस्थेच्या बाबतीत आलेला कोणताही माहिती मागणी अर्ज हा त्या संस्थेकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ चा कलम ६(३) अन्वये हस्तांतरण न करता अर्जदाराने मागणी केलेली माहिती उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश संस्थेस करणे आवश्यक आहे हे अतिशय स्पष्टपणे आहे.
याचाच अर्थ सहकारी संस्थेच्या निबंधक कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांच्याकडे एखाद्या सहकारी संस्थेविषयी माहिती मागणी अर्ज आल्यानंतर त्यांनी तो हस्तांतर करणे ही बाब चुकीची आहे.मात्र या सर्व गोष्टी व परिपत्रकांचा विसर पडल्याने सहकार खात्याचे जन माहिती अधिकारी हे अर्जदाराचा अर्ज संस्थेकडे हस्तांतरित करून स्वतःचा बचाव करण्याचा खोटा प्रयत्न करतात. त्यातच त्यावर संबंधित अर्जदारास पुनश्च वेळ व पैसा वाया घालून प्रथम अपील करावे लागते. यामुळे अर्जदारास विनाकारण प्रथम अपीलाला जाणे त्याचा पुन्हा अर्ज करणे तसेच संबंधित प्रथम अपील अधिकारी यांचा महत्त्वाचा वेळ प्रथम अपिलीय सुनावणीसाठी देणे ही शासकीय कामकाजातील वेळेची उधळपट्टी आहे.असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
नेमके असेच या माहिती अधिकार अर्जावर अर्जदाराच्या बाबतीत घडलेले आहे.मात्र यात जिल्ह्यातील अतिशय कर्तव्यदक्ष व कर्तव्य पालन करणारे सहाय्यक निबंध सहकारी संस्था शिंदखेडा यांनी तब्बल एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील सदर अर्जदाराच्या प्रथम अपिलीय अर्जावर सुनावणीच घेतली नाही. त्यामुळे अर्जदाराने दप्तर दिरंगाई कायदा २००५ सुधारित कायदा २०१३ तसेच प्रथम अपिलीय अधिकारी त्यांच्या कार्यालयाची नागरिकांची सनद तसेच शासनाचे याबाबतचे वेळोवेळी काढलेले परिपत्रक आदेश व अधिसूचना यानुसार प्रथम अपील अधिकारी यांनी आपल्या कर्तव्य पालनात केलेल्या कसुरीबाबत कायदेशीर कारवाई होण्याबाबत तक्रार अर्ज वरिष्ठ व सक्षम अधिकारी म्हणून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांच्याकडे केलेल्या असल्याची माहिती दिली आहे.
याबाबत प्रथम तक्रारी अर्ज दिल्यानंतर, मागणी अर्जातील माहितीशी संबंधित......पवार नामक व्यक्तीने अर्जदारास भ्रमणध्वनी वरून काहीतरी धमकी व लालच देण्याचा प्रयत्न केल्याची देखील माहिती मिळाली असून त्याबाबत त्यांनी आपल्या द्वितीय तक्रार अर्जात तशी नोंद करून विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांना कळवल्याचे आम्हा सांगितले आहे. प्रत्येक वेळेला आपल्या अधिकाऱ्याला कशे वाचवता येईल अशाच पद्धतीने न्याय देणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत देखील त्यांनी शंका व्यक्त करून त्यांना खरोखर न्याय मिळेल का ? व संबंधित अधिकाऱ्यावर कर्तव्यपालनातील कसुरीनुसार कायदेशीर कार्यवाही होईल का ? हा प्रश्न उपस्थित करून यावर विचार करण्यास प्रशासकीय व्यवस्थेला
भाग पाडले.
( वाचा सविस्तर पुढील अंकात..)
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
शिरपूर तालुक्यातील तोदे गावातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या जिल्हा परिषद शाळेची इमारत सतत पाऊस चालू असल्याकारणाने अखेर रात्री अचानक कोसळली.सु...
-
शिरपूर प्रतिनिधी:-महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती व हस्ती बँक दोंडाईचा यांच्या...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील श्री महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी)* यांच्या देश सेवा निवृत्त निमित्त आज दि 27 रोजी गागेश्वर महादेव मंद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा