Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई...! 15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले,
नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई...! 15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले,
नाशिक प्रतिनिधी:- नाशिकमधील तहसीलदाराला 15 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पडकडण्यात आले आहे.नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही मोठी कारवाई केली.नाशिक तहसीलदार नरेश कुमार बहिरम हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.त्यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती.
गौण खनिज प्रकरणातील सव्वा कोटी रुपयांच्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी नरेश कुमार यांनी 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. एकदा झालेला आदेश फेरतपासणीसाठी घेण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
मागील अठरा दिवसांपासून जिल्ह्यात एकही कारवाई झालेली नव्हती. अशातच प्रशासनातील मोठा मासा गळाला लागला आहे.नाशिक तालुक्यातील राजूर बहुला येथील जमिनीत मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी जवळपास एक कोटी रुपयांची दंड आकारणी केली.याविरोधात जमीन मालकाने थेट उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले.या प्रकरणाची फेर चौकशीसाठी तहसीलदार बहीरम आले असता त्यांनी पंधरा लाख रुपयांची मागणी केली.यानंतर तक्रारदाराने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कळविल्यानंतर बहिरम यास लाच घेताना अटक केली.
नाशिक तालुक्यातील राजुर बहुला येथील जमिनीमध्ये मुरुम उत्खननाबाबत मूल्य नियमानुसार पाचपट दंड,स्वामित्वधन जागा भाडे मिळून एकूण रक्कम 1 कोटी 25 लाख 6 हजार 220 याप्रमाणे दंड आकारणी केल्याबाबत संशयित यांच्या कार्यालयाकडील आदेश आले होते. त्या आदेशाविरुद्ध जमिनीच्या मालक यांनी नाशिकच्या उपविभागीय कार्यालयात अपील दाखल केले होते. त्याबाबत आदेश होऊन सदरचे प्रकरण फेर चौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा