Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
सोनगीर पोलीसांनी शेतक-यांच्या मोटर पंप (जलपरी) चोरी करणा-या चोरटयांना कले जेरबंद,मुददेमाल केला हस्तगत...
सोनगीर पोलीसांनी शेतक-यांच्या मोटर पंप (जलपरी) चोरी करणा-या चोरटयांना कले जेरबंद,मुददेमाल केला हस्तगत...
सोनगिर प्रतिनिधी:-दि.03/08/2023 रोजी फिर्यादी नामे गजेद्र सुकलाल शिंदे वय 59 वर्ष व्यवसाय शेती रा.कावठी ता.जि.धुळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुरनं. 210/2023 भादवी कलम 379 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयात फिर्यादी व इतर तीन शेतक-याच्या विहिरीतील जलपरी मोटार पंप चोरी झाल्या आहेत.सदर गुन्हयाचा तपास असई/रविंद्र राठोड यांचे कडेस दिलेला आहे.
सदर गुन्हयात सोनगीर पो स्टे प्रभारी अधिकारी सपोनि श्री गणेश फड यांना बातमीदाराकडुन,गोदुर,नेर येथील काही चोरटयांची बातमी मिळाल्याने सपोनि फड यांनी पोना 1348 राहुल सानप, पोकों1563 सुरज सावळे अशा पथकास तात्काळ सदर गुन्हयाचे तपासकामी रवाना केले असता त्यांनी नेर,ता.जि.धुळे येथून दोन संशयीत यांना ताब्यात घेतले त्यावरून केलेल्या चौकशीत गोदुर ता.जि.धुळे येथील 03 जणाचे नाव समजल्याने त्यांना देखील ताब्यात घेवुन कसून तपास केला असता केला असता सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली त्यांच्याकडुन लागलीच एक मोटर पंप (जलपरी) हस्तगत केली असुन चोरी करण्यासाठी वापरलेल्या दोन मोटर सायकल जप्त करण्यात आल्या तसेच सदर आरोपीनी चोरी केलेल्या इतर मोटर पंच(जलपरी) या धुळे येथील इमरान शेख रौफ रा. मोगलाई धुळे या भगार व्यवसायीकास विक्री केल्याचे सांगीतले.सदर भंगार व्यवसायीकाचे येथुन सोनगीर पोलीस स्टेशन येथे दाखल १) गु.र.नं. 42/2023 भादवि कलम 379 अन्वये व २) गुरनं. 210/2023 भादवी कलम 379 अन्वये या गुन्हयांतील एकुण चार जुन्या वापराच्या मोटार पंप जप्त करण्यात आल्या आहेत.अशा एकुण 05 मोटार पंच सुमारे 32,000/- रुपये किंमतीच्या आरोपीताकडुन जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी पैकी 1) वासुदेव प्रकाश भिल वय-30 रा. भिलाटी नगाव रोड गोदुर ता.जि.धुळे 2) रामु गुलाब पवार वय 19 वर्ष रा.रा. भिलाटी नगाव रोड गोदुर ता.जि.धुळे यांनी त्याचा साथीदार आकाश विकास पवार,रा.गोदुर ता.जि.धुळे याच्या मदतीने यापुर्वी कावठी मेहेरगांव सैताळे,चिंचवार,गोदुर,मोराणे, इत्यादी शिवारातुन अनेक मोटर पंप चोरी केल्याचे सांगितले आहे.त्याअनुषगाने सदर दोन आरोपीना अटक करून मा.न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मंजुर असुन अधिक तपास करीत आहेत तसेच यातील ताब्यात घेतलेले संशयीत पैकी इतर 03 विधी संघर्ष ग्रस्त बालकांना त्याच्या पालकाच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक धुळे श्री.संजय बारकुंड सो, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे सो,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग,साक्री श्री साजन सोनवणे सो,याचे मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक श्री गणेश फड,असई रविद्र राठोड,किरण राजपुत,पोना 1348 राहुल सानप, पोना 1142 अमरिश सानप, पोकों 1563 सुरज सावळे, पोकों/491 उन्मेश आळंदे यानी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा