Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

शिरपूर आगाराचे आगार प्रमुख श्री संजय कुलकर्णी साहेबाचा सेवापूर्तीचा कार्यक्रम संपन्न...!



सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो.पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक..अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते.

शिरपूर आगाराचे आगार प्रमुख श्री संजय कुलकर्णी साहेब आज आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर रा.प.सेवेमधून सेवानिवृत्त होत आहेत.साहेबांची वागणूक अतिशय प्रेमळ व कमी वेळातच सर्व कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये आदर्श व चांगली जागा निर्माण केली. साहेबांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा.साहेबांना निरोप देण्यासाठी शिरपूर आगाराचे कामगार संघटना अध्यक्ष पी व्ही भोई,श्री ईश्वर चौधरी, कैलास भामरे,जे एस कुलकर्णी,ए आर मोरे,एस बी गोराड नाझीम दादा,नरेंद्र विसावे,ए पी पाटील,उमेश ओगले,
योगेश कणखंरे,भाऊसाहेब बागुल,
जगदीश पाटील, व्ही आर पाटील यांच्या सह कर्मचारी वृंद यांनी सत्कार करून तसेच भावी आयुष्यासाठी निरोगीमय अशा शुभेच्छा दिल्या.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध