Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
शिकारी अटकला स्वतःच्या जाळ्यात...! वनविभागाने केली शिकाऱ्यांची शिकार
शिरपूर वनक्षेत्रातील भोरखेडा / असली राखीव वन कंपार्टमेंट जंगलात दि 30 रोजी रात्रीच्या सुमारास शिकार करण्याच्या उद्देशाने जंगलात फिरतांना सहा संशयितांना वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या ताब्यातून दोन ठासणी बंदुकांसह छर्रे व पावडर जप्त करण्यात आली आहे.
शिरपूर वनक्षेत्रातील भोरखेडा / असली राखीव वन कंपार्टमेंट जंगलात दि 30 रोजी रात्रीच्या सुमारास अंधाराच्या फायदा घेत सहा संशयित शिकार करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती शिरपूर वनविभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती.त्या माहिती नुसार वनविभागाच्या पथकाने जंगलात जाऊन महेंद्र सुरेश पावरा, विश्वास विजेंद्र पावरा,राकेश लालसिंग पावरा,सनस लालसिंग पावरा,अजित कालुसिंग पावरा सर्व रा.टिटवापाणी (चिलारे) यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या कडून दोन ठासणी बंदूक,13 छर्रे,टॉर्च 2 आणि काळी पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिकार करण्याच्या उद्देशाने रात्री जंगलात फिरत असल्याचे सांगण्यात आले असून न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही नितीन कुमार सिंग ( उपवनसंरक्षक, धुळे) व आनंद कुमार मेश्राम (सहाय्यक वनसंरक्षक,शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली के.पी.पाटील वनपाल हिसाळे,आर.ई.पाटील वनपाल रोहिणी व पा.आप साळुंखे वनरक्षक दहीवद व देवीदास पाटील वनमजुर हिसाळे, कैलास शिरसाट, विशाल शिरसाट वाहनचालक व राजेंद्र माळी शिरपूर आदींनी केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा