Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

साक्री तालुक्यातील युरिया खताच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांची भटकंती, अधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र सुस्त ! शेतकरी हवालदिल !



साक्री तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांवर जीवन मरणाची टांगती तलवार आहे एकीकडे समाधानकारक पाऊस पडत नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला दुसरीकडे युरिया खत भेटत नाही शेतकरी हैराण झाला असून कृषी अधिकारी व लोकप्रतिनिधी सुस्त व शेतकरी फस्त ? अशी परिस्थिती साक्री तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.काही कृषी सेवा केंद्र युरिया हा साठवणूक करून चढ्या भावाने विक्री करण्याचे प्रमाण ही साक्री तालुक्यात वेळोवेळी दिसून आले आहे त्यावर देखील अंकुश ठेवन्याचे काम कृषी विभागाने करणे गरजेचे आहे
शेतकऱ्यांनी वरूनराजावर भरवसा ठेवत मोठ्याप्रमाणावर पैशे शेतात पेरणीसाठी खर्च केला असून ऐनवेळी पिकांना टाकायला खत मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला असून शेतकऱ्यांना खतासाठी भटकंती करावी लागत आहे श्रीमंत शेतकऱ्यांनी आधीच खताचा साठा करून ठेवला व गरीब शेतकरी मारला गेला त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर नाराजीचे सूर उमटताना दिसून येत आहेत व्यापारी आणि कृषी अधिकाऱ्यांचे काही साटेलोटे आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकऱ्यांमध्ये एवडी नाराजी असताना एकही धाडसत्र तालुक्यात कृषी अधिकाऱ्यांचे दिसले नसून कृषी अधिकारी एवढे गप्प का ?
अशा परिस्थितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार देखील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे युरिया खत देत असताना इतर खत घेण्यासाठी सक्ती केली जाते त्याच्यावर निर्बंध घालून दुकानाबाहेर भावफलक लावणे जेणे करून खताचा साठा करून चढत्या भावाने खताची विक्री होणार नाही व साठेबाजा ला आळा बसेल तसेच प्रहार जनशक्ती पक्ष व संघटना कडून साक्री तहसिलदार सोनवणे यांना अलटीमेटम देण्यात आला असून तात्काळ खत शेतकऱ्यांपर्यंत पोचले नाही व एकही शेतकऱ्याची आत्महत्या खतासाठी झाली तर याला सर्व संबंधित प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे आशयाचे पत्र तालुका विभाग प्रमुख जयेश बावा व उपाध्यक्ष संजय पाटील यांनी दिले, यावेळी उपस्थित उपाध्यक्ष नानभाऊ शेलार, शेतकरी संघटनेचे राहुल गवळे, राजू कोरडकर,प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, चंद्रशेखर अहिरराव,राजेंद्र भदाणे, मुन्ना अहिरराव पपु बोरसे, गोलू बोरसे, उपस्थित होते.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध