Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १२ ऑगस्ट, २०२३

धूळपिंपरीत गोंडगाव घटनेची पुनरावृत्ती...! ग्रामस्थांचा पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या...!



तरुण गर्जना प्रतिनिधी:-
भडगांव तालुक्यातील गोंडगाव येते घडलेल्या दुर्दैवी घटनेचे पडसाद उमटत असतानाच पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येते घटनेची पुनरावृत्तीचा प्रयेतंन झाला.सुस्त पोलिस प्रशासनाच्या विरोधात एकच लाट उसळली असुन संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर रस्ता रोको केल्या नंतर आरोपीवर कारवाई करण्यात आली. अल्पमुलीवर अत्याचार वाढत असताना देखील अत्याचार करणाऱ्या नराधमाला कायद्याचा कोणताही धाक न राहिल्याने असले कृत्य वारंवार होत आहेत.या विरोधात देखील जनमानसात प्रचंड चिड असुन कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. 

नैसर्गिक विधी साठी नदी काठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर जबरजस्ती अत्याचार करून दगडाने डोक्यावर वार करत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करुन अल्पवयीन मुलीला जबर जखमी केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध