Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने स्वातंत्र्य दिनी वृक्षारोपण व माजी सैनिकांचा सत्कार...!



शेगाव प्रतिनिधी: उमेश राजगुरे.
शेगाव - 15 ऑगस्ट स्वातंत्र्याचा दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत असतो.स्वातंत्र्य दिनाचे अवचित साधून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार तालुका व शहर संघटनेच्या वतीने शेगाव बस स्थानक तसेच नागझिरी रोड तीन पुतळा परिसरातील असलेले स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करण्यात आले व माजी सैनिक विनोद गव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगाव तालुका व शहर च्या वतीने वृक्षारोपण करतेवेळी  माजी नगर उपाध्यक्ष सुषमाताई शेगोकार, सामाजिक कार्यकर्ते अतिश सुरवाडे,
अजय धुरंदर, प्रदिप शेगोकार तसेच परिसरातील नागरिक तसेच बस स्थानक परिसरात  बस स्थानक प्रभारी तांबटकर मॅडम, इंगळे साहेब, कलोरे साहेब, व इतर कर्मचारी उपस्थित  होते
स्वातंत्र्य वीरांची आठवण व्हावी म्हणून दरवर्षी वर्धापनदिन साजरा करतो.
ज्यांना लिहिल्या स्वतंत्राची गाथा,
त्याच्या चरणी ठेवू माथा, भारत देशासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या सर्व शहिदांना व ज्या भारत देशात या शहिदांचे आणि महापुरुषांचे उपकार आहेत.कित्येक वीर पुरुष तसेच सैन्यातील सैनिक या स्वातंत्र्य दिनासाठी शहीद झाले ते सदैव स्मरणात राहण्यासाठी समाजात सैनिकांचे नवचैतन्य निर्माण करण्यासाठी माजी सैनिक विनोद गव्हाळे यांच्या घरी संघटनेचे पदाधिकारी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. 

सदर कार्यक्रमाला  संघटनेचे तालुकाध्यक्ष देवचंद्र समदुर, शहराध्यक्ष उमेश राजगुरे, तालुका कोषाध्यक्ष सागर सिरसाट, तालुका उपाध्यक्ष गौतम इंगळे, शहर उपाध्यक्ष दिनेश घाटोळ, अक्षय सावदेकर, उमेश सिरसाट,सचिन कडूकार प्रशांत खत्री व अनेक वृक्ष प्रेमींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध