Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

साक्री तालुक्यातील जामखेली धरणातून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी मालपुरच्या स्वामी समर्थ पाणी वापर संस्था यांच्याकडून निवेदन देण्यात आले



जामखेडी मध्यम प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यातून दापूर,शेणपूर,धाडणे व मालपूर या मार्गाने सोडण्यात यावे व सोडलेले पाणी पाटचारीच्या शेवटच्या टोका पर्यंत ( कारखाना फाटक्या पर्यंत) पोहोचण्यासाठी त्वरीत उपाय योजना करावी. या मागणीचे निवेदन साक्री येथील उपविभागीय अधिकारी लघुपाटबंधारे विभाग साक्री यांच्या कार्यालयात श्री स्वामी समर्थ पाणी वापर संस्था मालपूर चे प्रतिनिधी व मालपूरचे ग्रामस्थांनी या कार्यालयाचे प्रतिनिधी एच्.सी.पिसोळकर व कैलास अहिरराव यांचे कडे आज देण्यात आले. व सदर कार्यवाही येत्या दोन-चार दिवसाच्या आत पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली.गेल्या अडीच महिण्या पासून पाऊस अजिबात झालेला नाही परिणामी सिंचन विहीरींनी तळ गाठले आहे.पेरलेली पिके धोक्यात आली आहेत ,या चारीतून पाणी शेवटच्या टोकापर्यत पोहोचले तर शेतक-यांना थोडा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली.शिवाय तसे झाले नाही तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल अशा भावना निवेदकांनी या प्रसंगी व्यक्त केल्यात.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध