Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
आमदार काशिराम पावरा यांनी धुळे येथे खाजगी रुग्णालयात जाऊन सांगवी येथील दुर्घटनेतील तिन गंभीर जखमींची सहानुभूतीपूर्ण केली चौकशी....!
आमदार काशिराम पावरा यांनी धुळे येथे खाजगी रुग्णालयात जाऊन सांगवी येथील दुर्घटनेतील तिन गंभीर जखमींची सहानुभूतीपूर्ण केली चौकशी....!
शिरपूर : शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी धुळे येथे खाजगी रुग्णालयात जाऊन सांगवी येथील दुर्घटनेतील तिन गंभीर जखमींची सहानुभूतीपूर्ण चौकशी केली.
सांगवी येथील दंगलीच्या घटनेत गेल्या आठवड्यात मन्या लक्ष्मण भिल, सुभाष भील व शिवदास भील या तिघांवर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची सहानुभूतीपूर्ण विचारपूस करण्यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा हे 14 ऑगस्ट 2023 सोमवार रोजी दुपारी धुळे येथे गेले. तीनही गंभीर रुग्णांची विचारपूस करून त्यांच्यावर पुढील उपचार होण्यासाठी सर्व रुग्णांना मुंबई येथे पाठविण्याबाबत माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व
शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आमदार काशिराम पावरा यांच्यासह धुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती कैलास पावरा, सांगवी येथील जिल्हा परिषद सदस्य योगेश बादल हे उपस्थित होते.
तीनही गंभीर रुग्णांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु असून सर्व नियोजन भूपेशभाई पटेल हे करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा