Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
पत्रकार मारहाण प्रकरणी इंदापूरात एकवटले पत्रकार.पाचोरा घटनेचा काळ्या फीती लावुन मोर्चाद्वारे केला निषेध... 14/8/2023
पत्रकार मारहाण प्रकरणी इंदापूरात एकवटले पत्रकार.पाचोरा घटनेचा काळ्या फीती लावुन मोर्चाद्वारे केला निषेध... 14/8/2023
इंदापूर :
पाचोरा (जि.जळगाव) येथील पत्रकार संदिप महाजन हे रेल्वे आंदोलणाच्या बातमीचा इतिवृतांत घेवुन त्यांच्या घरी परतत असताना पाचोरा गावातील मुख्य चौकात गावगुंडाकडून संदिप महाजन यांचेवर भ्याड हल्ला झाला.
सदरची घटना ही गंभिर स्वरूपाची असुन देखील तेथील स्थानिक पोलीसांनी आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही.सदर घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील पत्रकारांनी काळ्या फीती लावुन मोर्चाद्वारे जाहिर निषेध नोंदविला.व संबधीत आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पत्रकार संदिप महाजन व त्याचे कुटुंबीय यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
सोमवार दि.१४ आॅगष्ट २०२३ रोजी तालुक्यातील पत्रकार हे इंदापूर नगरपरिषद मैदान येथे सकाळी ठीक ११ वाजता जमा झाले.तेथुन काळ्या फीती लावुन मोर्चा काढण्यात आला.सर्वप्रथम इदापूर पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले.त्यानंतर मोर्चा तहसिल कार्यालय या ठिकाणी नेण्यात आला.या ठिकाणी निवासी नायब तहसिलदार आणिल ठोंबरे यांना पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले.व पाचोरा येथे पत्रकारास झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदविण्यात आला.तसेच पत्रकार संदिप महाजन यांचेवर झालेल्या हल्यातील आरोपीवर कायदेशिर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी सुवर्णयुग पतसंस्थेचे माजी व्हा.चेअरमन पोपट पवार, सामाजिक कार्यकर्ते सिताराम काटे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता जगताप,शिवशाही शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष नितिन आरडे, मोहन देवकर, शिवसेना (शिंदे गट) इंदापूर शहरध्यक्ष आशोक देवकर,सोनु ढावरे यांनी पत्रकार निषेध मोर्चाला पाठींबा दीला.
स्थानिक आमदार यांचे सहकारी गावगुंड यांनी पत्रकार संदिप महाजन यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असुन.सदरची घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी व लोकशाहीचे धिंडवडे उडवणारी आहे.स्थानिक आमदार यांनी घटनेच्या आदल्या दिवशी पत्रकार संदिप महाजन यांना अर्वाच्च शिविगीळ केली होती.आणि त्याच्या दुसर्या दिवशी संदिप महाजन यांचेवर गावगुंडाकडुन भ्याड हल्ला घडवुन आणण्यात आला.सदर प्रकरणातील हल्याचे मुख्य सुत्रधार हे स्थानिक आमदार हेच असुन आमदारासह सर्व आरोपींचा व घटनेचा तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने निषेध करण्यात आला.
या प्रसंगी इंदापूर तालुक्यातील पत्रकार मोठ्या संखेने उपस्थित होते.सुधाकर बोराटे,प्रकाश आरडे,काकासाहेब मांढरे,कैलास पवार, धनंजय कळमकर, सचिन खुरंगे,शिवाजी पवार, प्रदिप तरंगे,आबासाहेब उगलमोगले,पल्लवी चांदगुडे,तुकाराम पवार,संतोष जामदार,मुक्तार काजी,श्रेयश नलवडे,प्रदिप पवार,जितेंद्र जाधव,विजय शिंदे,सिद्धार्थ मखरे, बापू बोराटे,निलकंठ भोंग,निलेश गायकवाड, संजय शिंदे, शिवकुमार गुणवरे, तात्याराम पवार,आण्णा गायकवाड,शंकर बोडके, नानासाहेब लोंढे,इम्तियाज मुलाणी,गणेश कांबळे,राकेश कांबळे,आदित्य बोराटे,तेजस्वी काळे,सतिश जगताप,आशोक घोडके,धनाजी शेंडगे,विजय भगवान शिंदे,सलीम शेख, प्रदिप पवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा