Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३
स्पर्धा यश मिळविलेल्या यशवंतांचा सत्कार...!
अक्कलकुवा (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या वकिलांचा सत्कार समारंभ अक्कलकुवा व धडगाव वकिल संघाचे पदाधिकारी यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम तालुक्यातील डाब देवगोई याहा मोगी माता मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला याहा मोगी मातेच्या मंदिरात जाऊन पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड.रुपसिंग वसावे यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.एन.एस.शेख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.राजेंद्र इंदिस,अॅड.जगदीश कुवर,
अॅड.आर.आर.मराठे,अॅड.सचिन राणे, अॅड.रवींद्र वसावे, अॅड.संग्राम पाडवी, अॅड.बापु पावरा हे उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहाय्यक अभियोक्ता म्हणून निवड झालेल्या अॅड.ईश्वर वळवी, अॅड.रोहिदास पाडवी, अॅड.पी.आर.ठाकरे,अॅड.गोमता पावरा, अॅड.दिलीप वळवी,अॅड.चेतन वळवी, अॅड.कुवरसिंग वळवी, अॅड.वनिता वळवी, अॅड.लक्ष्मी पावरा आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड.राजेंद्र इंदिस ,अॅड.जगदीश कुवर ,अॅड.आर.आर.मराठे, अॅड.सचिन राणे,अॅड.संग्राम पाडवी अॅड.वसंत वळवी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एन. एस.शेख यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, "गरीबी यशाच्या आड येत नाही.फक्त सतत अभ्यास, प्रामाणिकपणा आणि विनम्रता अंगी बाळगून जिद्दीने परिस्थितीला अनुकूल करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजे. तेव्हा निश्चिंत यश मिळते." यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.गजमल वसावे यांनी केले तर आभार अॅड. छोटू वळवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अक्कलकुवा व धडगाव वकील संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने वकील व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा