Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २९ ऑगस्ट, २०२३

बचत गट घोटाळ्यातील सावकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता…! शेतक-यांच्या बॅकेतील अजून एक घोटाळा समोर येण्याच्या मार्गावर….!



शिरपूर प्रतिनिधी:- जिल्ह्यातील नामांकित शेतक-यांच्या बॅकेतील मागे घडलेल्या बचतगटाबरोबर इतरही  घोटाळ्यातील बरेचशे बाजू आम्ही उघड्या केल्यानंतर त्याबाबत विभागीय स्तरावरुन चौकशी नंतर अजून बरेच कही समोर येईलच. मात्र त्यापुर्वीच  शेतक-यांच्या बॅकेतील अजून एक अजब गजब प्रकरण समोर येण्याच्या मार्गावर आहे.  

यामुळे बचत गट घोटाळ्यातील सावकाराबरोबर अजून कितीतरी बँक कर्मचाऱ्यांवर हे संकट कोसळते, ते समजेलच. मात्र यात बचत गट घोटाळ्याचा प्रमुख स-हाईत सावकारच्या अडचणीत नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे. व त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्या कर्मचा-यांना पाठीशी घालणारा बॅकेच्या मोरक्या नेमकी काय कार्यवाही करेल. याकडे पुर्ण लक्ष लागून असेल.

याबाबतची सविस्तर माहिती दुखी अत्मांकडून आमच्यापर्यत वेळोवेळी पोहचत असली तरी अजून ज्यांना ज्यांना याबाबत माहिती असेल त्यांनी ती पुरवावी असे आम्ही आव्हान करत आहोत. कोणत्याही परिस्थितीत नाव उघड केले जाणार नाही. यांची देखील हमी आम्ही देत आहोत.

(सविस्तर वाचा पुढील अंकात)





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध