Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण...! सहकारातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे त्यांच्याच संस्थेत बेजबाबदारपणे कायद्याचे सर्रास उल्लंघन...! 14/8/2023



सहकार खात्यातील मूठभर अधिकारी स्वतःला सहकार महर्षी समजणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्हा सहकार खात्यातील सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित धुळे या संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे नियमबाह्य कारणामे नेमके कोणकोणते व दुसऱ्याला ब्रह्मज्ञान शिकवणाऱ्या या ज्ञानींना आता स्वतःच्या ज्ञानाची विसर पडली की काय म्हणून त्यांची कान उघडणी करून ब्रह्मज्ञानाचा डोस देणे गरजेचे आहे.


धुळे व नंदुरबार जिल्हा सहकार खात्यातील सेवकांची पतपेढी मर्यादित धुळे ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कायद्यान्वये नोंदणीकृत सहकारी पतसंस्था असून सदर संस्था विभागीय कार्यक्षेत्राची असल्याने सदर संस्था मा.विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे.

परंतु तिचे मुख्य कार्यालय धुळे येथे असल्याने संस्थेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे या कार्यालयाची येते.

मग....हुशार,....कर्तव्यदक्ष,....प्रामाणिक

असलेले जिल्हा उपनिबंधक धुळे हे नेमकी यावर काय कारवाई करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कायद्याची अंमलबजावणी करणारेच जेव्हा कायदे भंग केल्यानंतर आमच्यावर कोण कारवाई करणार ? या अविर्भावात नियमबाह्य पद्धतीने कामकाज करतात.मग इतरांवर कारवाई करण्याचा यांना नेमका काय अधिकार ? उपरोक्त संस्थेचे मूठभर पदाधिकारी अत्यंत बिनधास्तपणे कायदा तोडुन, कायद्याचे सर्रास उल्लंघन करून संस्थेचे कामकाज करीत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७५ अन्वये दरवर्षी ३० सप्टेंबरच्या आत सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक असताना या संस्थेची सन:- २०२१-२०२२ या मुदतीची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक:- २९/०७/२०२३ रोजी घेण्यात आली आहे.

याचाच अर्थ ३१ सप्टेंबर २०२२ च्या आत सदर सभा घेणे बंधनकारक असताना संस्था चालकांनी सदरची सभा मुदतीत घेतलेली नाही. मग कायद्यातील तरतुदीनुसार उपरोक्त संस्थेच्या निबंधकाने सदर संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा स्वतः का बोलावली/घेतली नाही. कलम ७५ चे व त्यातील तरतुदींचे पालन न करणाऱ्या इतर संस्थांविरुद्ध कारवाई करणारे सहकार खात्यातील अधिकारी या संस्थेविरुद्ध कायदेशीर कारवाई करतील का? तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १४६ चा वापर करून त्यातील तरतुदीनुसार सदर संस्थेचे निबंधक म्हणजे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक हे कारवाई करतील का? याकडे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सहकार खात्यातील जाणकार जनतेचे लक्ष लागून आहे.

क्रमश..........

(वाचा सविस्तर पुढील अंकात... )




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध