Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

शिरपूर तालुक्यातील थाळनेर ते भोरखेडा रस्त्यावर 14 ऑगस्टला सकाळी मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिकअप गाडी पलटी...! 14/8/2023




शिरपूर प्रतिनिधी:- मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिकअप उलटून झालेल्या अपघातात 22 मजूर जखमी झाले.जखमींमध्ये 21 महिला व एका पुरुषाचा समावेश आहे.त्यातील 14 जणांना प्राथमिक उपचारानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील थाळनेर ते भोरखेडा रस्त्यावर 14 ऑगस्टला सकाळी 8 वाजेला हा अपघात घडला. मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिकअप (एमएच 18,बी. झेड 0167) चालकाचे नियंत्रण सुटून उलटली.
अपघातात दबले जाऊन मजुरांनी किंकाळ्या फोडल्या.त्या ऐकून परिसरातील शेतकरी व ये-जा करणारे वाहनचालक थांबले.त्यांनी जखमींना तातडीने थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.जखमींमध्ये सुनंदाबाई भरत मराठे, विमलबाई बळीराम मराठे, प्रियंका सुकलाल कोळी, प्रमिलाबाई भिका मराठे, अलकाबाई महेश सावळे, अनिताबाई अरविंद सावळे, छायाबाई बापू वाडीले, संगीता गुलाब कोळी, सरलाबाई सुभाष मराठे, वर्षा भगवान कोळी, राजेंद्र शांताराम शिरसाट, सपना किरण शिरसाट, नंदिनी सुकलाल कोळी, चंदनबाई पुंडलिक कोळी, वंदना दीपक शिरसाट, लताबाई देवराम पानसरे, निंबाबाई बन्सीलाल कोळी,
देवराम पानसरे, निंबाबाई बन्सीलाल कोळी, कविताबाई गुलाब कोळी, ज्योती छोटू बडगुजर, चंद्रभागाबाई आधार मराठे, प्रतिभा प्रवीण सावळे, सुनिता सुकलाल कोळी (सर्व रा. थाळनेर) यांचा समावेश आहे.

थाळनेर येथे प्रथमोपचार केल्यानंतर आवश्यकतेनुसार 14 महिलांना धुळे येथे रवाना करण्यात आले.पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यावर ब्रेक न लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी कळते. अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.दरम्यान थाळनेर येथील लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात भेट देऊन महिलांची विचारपूस केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध