Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १० ऑगस्ट, २०२३

भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकरिणी विशेष निमंत्रित सदस्यपदी प्रभाकरराव चव्हाण यांची निवड...!



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर शहराचे माजी नगराध्यक्ष, धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन तथा भाजपा शिरपूर तालुका प्रभारी प्रभाकरराव चव्हाण यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकरिणी विशेष निमंत्रित सदस्यपदी निवड झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजयभाऊ चौधरी यांनी प्रभाकरराव चव्हाण यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिरामदादा पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या शिफारस नुसार भाजपा प्रदेश कार्यकरिणी विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड केली.

त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल,आमदार काशिरामदादा पावरा,माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल,उद्योगपती चिंतनभाई पटेल,शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी,शहराध्यक्ष हेमंत पाटील,विविध संस्थांचे पदाधिकारी,अनेक मान्यवर तसेच शिरपूर शहर व तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिक, हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.

प्रभाकरराव चव्हाण हे गेल्या 40 वर्षांपासून शिरपूर वरवाडे नगरपरिषदेत नगरसेवक म्हणून उत्तम कामगिरी बजावत आहेत.2000 पासून धुळे व नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत.तसेच ते आमदार अमरिशभाई पटेल परिवारातील विश्वासू सहकारी म्हणून सर्वदूर सुपरिचित आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध